बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) पुन्हा एकदा भाजप सरकारविरोधात बोलताना दिसली आहे. भारत सरकारला धर्माची आठवण करून दिल्याबद्दल आखाती आणि अरब देशांचे आभार मानले पाहिजे असे स्वराच म्हणण आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वराने अनेक गोष्टी सांगितल्या. ज्याचे व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहेत आणि लोक त्यामुळे स्वरावर टीका करत आहेत.(Swara Bhaskar, BJP government, Arab countries, Prophet Muhammad)
पैगंबर मुहम्मद यांच्या विरोधात भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर स्वरा म्हणाली, आमच्या सत्ताधारी पक्षाचा धर्म काय आहे याची आठवण करून दिल्याबद्दल आम्ही आखाती आणि अरब देशांचे आभार मानले पाहिजेत. स्वरा पुढे म्हणाली, “द्वेष ही आग आहे, तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. मला आशा आहे की भाजपला खूप उशीर होण्याआधी हे कळेल.”
अँकरने स्वराला विचारले की, सरकार आता फक्त गरिबी आणि विकासावरच बोलेल असे वाटते का? त्यावर स्वरा म्हणाली, मी फक्त एवढेच सांगेन की, ‘गरीब कल्याण’, ‘सबका साथ सबका विकास’ हे आठ वर्षांनंतर सरकारला आठवले आहे आणि याच्याच जोरावर २०१४ मध्ये भाजपची सत्ता आली. याशिवाय स्वरा म्हणाली की आपण आता त्या युगात आलो आहोत जिथे द्वेष आणि द्वेषयुक्त भाषण सामान्य झाले आहे. याला प्रत्येकजण जबाबदार आहे. सत्ताधारी पक्षाने निवडणूक जिंकण्यासाठी द्वेषयुक्त भाषणाचा वापर केला आहे.
स्वराच्या या गोष्टींवर सर्व यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दीपक चंद्रा नावाच्या युजरने लिहिले की, ‘स्वरा ही कम्युनिस्ट आहे…100% पण कन्हैया कुमार सारखी ती देखील एखाद्या दिवशी काँग्रेसमध्ये जाऊ शकते..ती फक्त एका चांगल्या प्रस्तावाची वाट पाहत आहे. सावध राहा.’ हेमंत खरबंदा यांनी लिहिले, ‘तुम्हाला लाज का वाटत नाही? आपल्या देशाचे प्रकरण आपण स्वतःच सोडवू, परदेशातले आहेत का जे असे बोलतात. पण नाही, आपण देशद्रोही आहोत, होतात आणि राहणार.’
मनीषने लिहिले की, “स्वरा भास्कर, या विषयावर बोलण्याची तिची पात्रता आहे का? ते कोण आहेत? जे मला धर्माची आठवण करून देतात! हिला सांगा फक्त ४ संस्कृत श्लोक बोलून व्हिडिओ पोस्ट कर. कोकोनट पानी वाला ट्विटर हँडलवर टिप्पणी केली आहे, “हे नमूद केल्याबद्दल स्वरा धन्यवाद. आगीशी खेळायची सवय आहे. तसेच त्यांनी डायलॉग मारत म्हटले, नुपुर नाम सुनके फ्लावर समझे है क्या? फायर है वो फायर।”
काही दिवसांपूर्वी भाजप नेते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर कथित वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्यावरून स्वरा भास्कर सातत्याने निशाणा साधत आहे.
याआधीही स्वराने नुपूर शर्माला टोमणा मारला होता. नुपूर शर्मा, नवीन जिंदाल आणि टाईम्स नाऊ यांना टॅग करत स्वरा भास्करने लिहिले, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली लाज काढली जातेय आणि तुम्ही ते साजरा करताय, तु्मच्यातला द्वेषच भारतात दंगली घडवून आणतोय. या ट्विटवर सर्व युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
महत्वाच्या बातम्या-
असं केल्याने तुम्ही प्रगतीच्या दिशेने जाऊ शकत नाही, ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या वानखेडेंचे ट्विट चर्चेत
भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना शिरच्छेद आणि बलात्काराच्या धमक्या, ट्विट करत पोलिसांना म्हणाल्या..
शरद पवारांविरुद्ध होणाऱ्या आक्षेपार्ह ट्वीटची मालिका संपेना; केतकी चितळेच्या पोस्ट नंतर हे ट्विट तुफान व्हायरल
मध्यरात्री ट्विट करत मिलरने मागीतली आरआरची माफी; आरआरही खास रिप्लाय देत म्हणाले, दुश्मनना करे दोस्तने..