Share

PHOTO: ‘या’ हिंदू अभिनेत्रीने तब्बल चार वेळा केलंय मुस्लिम दिग्दर्शकाशी लग्न, कारण वाचून अवाक व्हाल

नव्वदच्या दशकात लहान मुलांच्या आवडत्या मालिकांपैकी एक ‘शरारत’ ही मालिका होती. या मालिकेत अभिनेत्री श्रुती सेठने (Shruti Seth) जिया ही भूमिका साकारली होती. जियाच्या भूमिकेने श्रुती सेठला खूप लोकप्रियता मिळवून दिली होती. तर आपल्या या पहिल्याच मालिकेद्वारे प्रसिद्ध झालेली श्रुती आज मात्र, प्रसिद्धीझोतापासून लांब राहत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? श्रुतीचा पती एक प्रसिद्ध दिग्दर्शक असून श्रुतीने त्यांच्यासोबत एक नाही तर तब्बल चार वेळा लग्न केलं आहे. तर तिने चार वेळा लग्न करण्याचे कारण काय? ते जाणून घेऊया.

श्रुतीने १० ऑक्टोबर २०१० साली दिग्दर्शक दानिश असलमसोबत लग्न केले होते. दोघांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. या दोघांच्या लव्हस्टोरीपासून लग्नापर्यंतचा किस्सा श्रुतीचा पती दानिशने एका पोस्टद्वारे सांगितले. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर श्रुतीसोबतचे त्याचे काही फोटो शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.

पोस्टमध्ये दानिशने सांगितले होते की, त्याची आणि श्रुतीची पहिल्यांदा फना चित्रपटाच्या सेटवर भेट झाली होती. त्यावेळी दानिश सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. तेव्हा सेटवर तो उपस्थित सर्व लोकांना जोरजोरात ओरडून सीन समजावून सांगत होता. त्यावेळी तिथेच उपस्थित असलेल्या श्रुतीने त्याच्या पॉकेटमध्येच असलेला माईक काढून त्याला दिला. आणि दानिशला सांगितले की, त्याच्याकडे माईक आहे.

या घटनेनंतर दोघांमध्ये संवाद सुरु झाला. श्रुती केवळ ९ दिवस सेटवर उपस्थित होती मात्र, दोघांमध्ये प्रचंड बोलणं झालं होतं. त्यानंतर ते दोघे चांगले मित्र बनले आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

श्रुती आणि दानिश दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते. श्रुती हिंदू तर दानिश मुस्लिम होता. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना लग्नासाठी तयार करणं कठिण होतं. मात्र, नंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी लग्नास होकार दिला. त्यानंतर सुरुवातीला दोघांनी गोव्यात ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न केला. त्यानंतर हिंदू पद्धतीनुसार आणि मुस्लीम पद्धतीनुसार विवाह केला. आणि शेवटी त्यांनी कोर्ट मॅरेजसुद्धा केला.

दरम्यान, श्रुतीने मॉडेलिंगद्वारे आपल्या करियरची सुरुवात केली. तिने अनेक ब्रँड्स साठी मॉडेलिंग केली आहे. मॉडेलिंगनंतर श्रुती छोट्या पडद्याकडे वळाली. सुरुवातीला तिने एका वाहिनीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून काम केले. २००१ साली तिने श्श्श… कोई है या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘मान’, ‘देश में निकला होगा चांद’, ‘क्यों होता है प्यार’, ‘कुछ कर दिखाना है’, ‘धक-धक इन दुबई’, ‘रिश्ता डॉट कॉम’ और ‘बाल वीर’ यासारख्या मालिकेत काम केले. तसेच आमिर खान आणि काजोलसोबत ती ‘फना’ या चित्रपटातही दिसली होती.

महत्त्वाच्या बातम्या :
अभिनेत्री शिवानी रांगोळेने प्रियकर विराजसशी गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य आलं समोर
‘भाजपने ‘द काश्मीर फाइल्स’ ची फुकट तिकिटे वाटली तशीच पेट्रोल-डिझेलसाठी कुपन्स वाटली पाहिजेत’
RRR साठी आलिया भट्ट नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रीला पहिल्यांदा आली होती चित्रपटाची ऑफर

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now