साऊथ चित्रपट अभिनेत्री साई पल्लवी ही तमिळ चित्रपटसृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने अल्पावधीतच मारी 2, प्रेमम आणि लव्हस्टोरी सारखे अनेक सुपरहिट चित्रपट देऊन इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. आता तिच्या लग्नाबाबत चर्चा सुरू आहेत. ती लवकरच लग्न बेडीत अडकणार असल्याचं समजत आहे.
तामिळ फिल्म स्टार साई पल्लवी लवकरच ‘राणा डग्गुबती’ स्टारर ‘वीरता पर्वम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ती तिच्या चित्रपट कारकिर्दीच्या अतिशय सुंदर टप्प्यावर आहे. अभिनेत्रीची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. मात्र आता तिच्या लग्नाबद्दल माहिती समोर आल्याने तिच्या डाय हार्ड चाहत्यांचे हृदय नक्कीच तुटले आहे.
माहितीनुसार, साई पल्लवीच्या लग्नासाठी तिच्या पालकांनी तयारी सुरू केली आहे. तिच्यासाठी पालकांनी परफेक्ट वराचा शोध सुरू केला आहे. आगामी ‘वीरता पर्वम’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच तिचे हात पिवळे होऊ शकतात, असा दावा केला जात आहे. मात्र, अद्याप याबद्दल साई पल्लवीने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
साई पल्लवी बद्दल अधिक माहिती सांगायची झाल्यास, ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ती फिल्मी दुनियेत आली. जिथे या अभिनेत्रीने अल्पावधीतच अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून आपली क्षमता सिद्ध केली.
साई पल्लवी तिच्या साध्या लुक आणि दमदार अभिनयामुळे लोकांच्या मनावर राज्य करत आहे. अभिनेत्रीचा मागील रिलीज झालेला चित्रपट नागा चैतन्य स्टारर लव्ह स्टोरी होता. जो सुपरहिट ठरला. अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी तिच्या चाहत्यांना 440 व्होल्टचा धक्का देणारी ठरली.
अभिनेत्रीच्या लग्नाबाबत बातम्या समोर येत असताना, एकीकडे तिचे काही चाहते खुश आहेत, तर काहींचे या बातमीने मन तुटले आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर अभिनेत्रीला तिच्या पसंतीबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. ती लव्ह मॅरेज करणार की अरेंज करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.