टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. खेळा व्यतिरिक्त त्याच्या पर्सनल लाईफचे किस्से देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. नुकतेच त्याचे आणि अभिनेत्री राय लक्ष्मी यांच्या अफेरच्या बातम्या व्हायरल होत होत्या, त्यावर आता स्वतः राय लक्ष्मीने मोठा खुलासा केला आहे.
गेल्या काही काळात महेंद्रसिंग धोनी आणि अभिनेत्री राय लक्ष्मी यांच्यातील लव अफेरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. दोघांच्या रिलेशनबाबत सोशल मीडियावर अनेक तर्क वितर्क लावले गेले. चाहत्यांनी देखील या मुद्यावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या होत्या.
मात्र, चाहत्यांना दोघांपैकी कोणीतरी स्वतः त्यांच्यात असणाऱ्या नात्याचा खुलासा करावा असे वाटत होते. ही प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली आहे. लक्ष्मीने यासंदर्भात तिची बाजू सांगितली आहे. एका मुलाखतीदरम्यान तिनं या व्हायरल होणाऱ्या गोष्टीबाबत खुलासा केला आहे.
मुलाखतीदरम्यान लक्ष्मी म्हणाली, धोनी आणि त्यासंबंधी इतर काही गोष्टी होत्या त्या कास्टिंग काऊच नव्हत्या. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते, नंतर ती व्यक्ती तुम्हाला आवडत नाही. काही गोष्टी तुमच्यामध्ये योग्य पद्धतीने होत नाहीत आणि तुम्ही दोघांच्या सहमतीने वेगळे होता.
तसेच म्हणाली, रिलेशनशिपमध्ये नसल्याचं मी कधीही म्हटलं नाही. माझी अशी बरीच नाती होती. मी लपून-छपून कोणालाही डेट केलं नाही. जर मी कोणाला डेट केलं असेल तर तुम्ही मला त्याच्यासोबत पाहिलं असेल. मी त्याच्यासंदर्भात बोलत नाही ही गोष्ट वेगळी आहे. पण मी त्या गोष्टींपासून पळ काढत नाही.
लक्ष्मी म्हणाली, जर मला कोणी बॉयफ्रेंडसोबत स्पॉट करून फोटो काढत असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. तिच्या या उत्तराने आता एवढ्या दिवस चाललेल्या सोशल मीडियावरील त्यांच्याविषयीच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. चाहत्यांना त्यांची उत्तरे लक्ष्मीकडून या मुलाखतीत मिळाली आहेत.