Share

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच अभिनेत्री नयनताराला आली कायदेशीर नोटीस; काय गुन्हा केला तिने? वाचा…

नुकतेच दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार नयनतारा हिचं दिग्दर्शक विग्नेश शिवन याच्यासोबत लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ते तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले. दरम्यान, अभिनेत्रीला तिरुमाला तिरुपती देवस्थानम समितीने नोटीस पाठवली आहे.

गुरुवारी ०९ जून रोजी अभिनेत्री नयनताराचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर हे कपल काल म्हणजेच शुक्रवारी १० जूनला तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी पोहोचलं होतं. यावेळी नयनतारा हिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एकीकडे अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना तिरुमाला तिरुपती देवस्थानम समितीने मात्र अभिनेत्रीला नोटीस पाठवली आहे. माहितीनुसार, नयनतारा आणि विग्नेश यांच्या मंदिरात जाण्यामुळे आणि त्याठिकाणी जाऊन आशिर्वाद घेण्याबाबत वाद निर्माण झाला आहे.

मंदिर समितीने असा आरोप केला आहे की, नयनतारा हिने मंदिर परिसरात फोटो काढले याशिवाय तिने मंदिर परिसरात वावरताना पायातील चप्पल देखील काढले नव्हते. शिवाय मंदिरात फोटो काढण्यास मनाई असताना देखील तिनं फोटो काढला असा आरोप देखील मंदिर समितीने केला आहे.

तिरुमला तिरुपति देवस्‍थानम समितिचे चीफ विजलेन्स सिक्योरिटी अधिकारी नरसिंह किशोर यांनी म्हटलं की, नयनतारा या दरम्यान मंदिर परिसरात चप्पल घालून फिरत होती. आमच्या सुरक्षा रक्षकांनी तिला लगेच अडवले. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर लक्षात आले की दोघांनी नियम तोडून फोटोशूट देखील केले आहे.

तसेच म्हणाले, आम्ही नयनताराला नोटीस पाठवत आहोत. आम्ही तिच्याशी फोनवर देखील संपर्क करत आहोत. ती व्हिडिओ मेसेज जारी करून भगवान बालाजी, मंदिर समिती आणि भाविकांची माफी मागायला तयार आहे. आता नयनतारा माफी मागणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now