Share

‘या फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहत्यांचे वाढले टेन्शन, पहा फोटो

सध्या मनोरंजन क्षेत्रात अनेक बदल होत आहे. छोट्या पडद्यावरील मनोरंजन कथा देखील बदलत आहे. अनेक नवनवीन कथा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. अशीच एक नवीकोरी मालिका मागील काही महिन्यांपासून चाहत्यांच्या भेटीला आली होती. ती म्हणजे स्टार प्रवाहवरील ‘या फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका. या मालिकेने खूप कमी कालावधीत चाहत्यांची मने जिंकली.

त्याचबरोबर या मालिकेतील कलाकार देखील आपली भूमिका उत्तम रित्या पार पाडत आहेत. खूप कमी कालावधीत कलाकारांनी चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. हे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. अशीच एक अभिनेत्री आहे तिची भूमिका चाहत्यांना खूप आवडली. या मालिकेतील ‘इमली’ ही भूमिका अभिनेत्री मधुरा जोशी साकारत आहे.

मधुरा ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. याच दरम्यान मधुराचा असा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून चाहत्यांची चिंता वाढली आहे.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, कलाकार आपली भूमिका पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी खूप कष्ट घेतात. जसा लूक भूमिकेसाठी पाहिजे तसा ते करत असतात. मात्र सध्याचा जो मधुराचा फोटो व्हायरल झाला आहे. तो नक्कीच चाहत्यांचे टेन्शन वाढवत आहे. तिचा हा फोटो पाहून चाहते तिला तिच्या तब्येतीबद्दल विचारत आहे. तर काही चाहते नवीन भूमिका आहे का असा प्रश्न करत आहे.

खरंतर मधुरा ही मराठी मालिकांसह हिंदी मालिकांमध्ये ही काम करते. सध्या ती हिंदी मालिका ‘पुण्यश्लोक आहिल्या’ या मालिकेत काम करत आहे. याच मालिकेतील तिचा हा लूक आहे. या मालिकेत ती ‘रेणू’ ही भूमिका साकारत आहे. याच भूमिकेसाठी तिने टक्कल केली आहे.

सध्या सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर चर्चेचा विषय बनला आहे. त्याचबरोबर तिचा हा लूक पाहून लोक तिला काळजी घेण्याचा सल्ला ही दिला आहे. तर काही जण तिच्या हा लूकचे कौतुक करत आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now