Share

अभिनेत्री काजोल देवगन कोरोनाच्या विळख्यात; मुलीला मिस करत शेअर केली पोस्ट

Kajol Devgan Tested Positive For Corona

कोरोनाच्या नव्या व्हेरिंयटमुळे देशभरात पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. दररोज अनेक लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. यादरम्यान आता बॉलिवूड अभिनेत्री काजोललाही (Kajol Devgan Tested Positive For Corona) कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबत काजोलने स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.

काजोलने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिने तिची मुलगी न्यासाचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच मी अजिबात इच्छित नाही की, कोणीही माझी रुडोल्फ नोज पाहावे. त्यामुळे आपण सर्वजण जगातील सर्वात गोड हास्य पाहूयात’.

यासोबतच काजोलने मुलगी न्यासाला मिस करत असल्याचेही पोस्टद्वारे सांगितले आहे. काजोलच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसोबत अनेक बॉलिवूड कलाकार कमेंट करत तिला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. तिच्या या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, ‘तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. लवकर बरे व्हा. न्यासा खरंच सुंदर दिसत आहे’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘सुरक्षित राहा काजोल आणि तुम्ही लवकरच बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत’.

काजोल आणि अजय देवगनची मुलगी न्यासा सध्या विदेशात शिक्षण घेत आहे. स्वित्झरलँडच्या ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये ती इंटरनॅशनल हॉस्पिटीलिटीचे शिक्षण घेत आहे. यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. न्यासा अद्याप सिनेसृष्टीत पदार्पण केली नसली तरी सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. तसेच तिच्या फॅन फॉलोअर्सची संख्याही एखाद्या अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही.

दरम्यान, आतापर्यंत करिना कपूर, जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी, मृणाल ठाकूर, एकता कपूर, अर्जून कपूर, अमृता अरोरा, नकुल मेहता, नोरा फतेही या कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूडसोबत दाक्षिणात्य सिनेसृष्टीतीलही अनेक कलाकारही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले,….
कोण होणार ‘बिग बॉस १५’ चा विजेता? आज रात्री ‘या’ पाच जणांमध्ये रंगणार फायनल
‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनय पाहून अनुपम खेर यांनी अल्लू अर्जूनचे केले कौतुक; म्हणाले, तू रॉकस्टार आहेस

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now