Share

चालत्या ट्रेनमध्ये अभिनेत्री जयाप्रदा यांना करावी लागली होती अंघोळ, त्यामागे होते हे मोठे कारण

jaya prada

जया प्रदा (Jayaprada) या बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या चित्रपटातील अभिनयाने सिद्ध केले आहे की त्या खरोखरच एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत. 70-80 च्या दशकात जयाप्रदा यांची उपस्थिती होती. त्या काळात ती मुख्य अभिनेत्री होती आणि श्रीदेवीशी(Sridevi) स्पर्धाही करायची. (Actress Jayaprada had to take a bath in a moving train)

जया प्रदा यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत खूप यश मिळवले आहे. जयाप्रदा यांनी लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. एकदा ती तिच्या शाळेतील एका स्पर्धेत नाचत असताना एका दिग्दर्शकाची तिच्यावर नजर पडली आणि तिला एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

जयाप्रदा यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात सरगम ​​या चित्रपटातून केली होती. त्यांचा पहिला चित्रपट हिट ठरला होता. ती रातोरात लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. पण तुम्हाला माहीत नसेल की एकदा त्यांना चालत्या ट्रेनमध्ये आंघोळ करावी लागली होती. चला तर मग आज आपण जाणून घेऊ असं का झालं?

जयाप्रदा यांनी एकदा तिच्या जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, तिला चालत्या ट्रेनमध्ये आंघोळ करावी लागली. कारण तिला लोकेशनवर पोहोचताच शूट करायचे होते आणि आंघोळ करायलाही वेळ नव्हता. जयाप्रदा यांनी सांगितले की, चित्रपटाचा एक सीन पहाटे शूट करायचा होता, 24 तास काम करत असताना तिने मेकअप करायलाही शिकले. जयाप्रदा म्हणाल्या होत्या, ‘स्क्रिप्टच्या मागणीनुसार आम्हाला शूटिंगसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं.

या परिस्थितीत आपण कसे चित्रीकरण केले, आज जेव्हा हे कळते की अभिनेत्रीने व्हॅनिटी व्हॅन न मिळाल्याने काम करण्यास नकार दिला, तेव्हा माझे डोके चक्रावते. जयाप्रदा यांची ही मुलाखत चर्चेत होती, त्यांच्या काळात त्यांची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात होती. जयाप्रदा यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.

1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कामचोर’ चित्रपटात जया पहिल्यांदा अस्खलित हिंदी बोलली. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘शराबी’ या सुपरहिट चित्रपटातही काम केले होते. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, 1986 मध्ये जयाप्रदा यांनी चित्रपट निर्माता श्रीकांत नाहटा यांच्याशी लग्न केले. जयाप्रदा ही श्रीकांतची दुसरी पत्नी होती पण त्यांना पत्नीचा दर्जा कधीच मिळू शकला नाही.

महत्वाच्या बातम्या-
पुणेरी लाँड्रीवाल्याचा प्रामाणिकपणा! कपड्यात सापडलेले सहा लाखांचे दागिने केले परत, होतंय राज्यभरात कौतूक
नितेश राणे अखेर कोर्टात शरण; आता सोमवारी होणार सुनावणी, राणेंच्या वकिलांनी केले मोठे विधान, म्हणाले…
तीन जवानांनी विवाहित महिलेवर केला बलात्कार; अश्लील व्हिडिओ काढून दिली धमकी, नंतर झाले फरार
“मोदींकडे विमान खरेदी करण्यासाठी साडे आठ हजार कोटी आहे, पण विद्यार्थ्यांच्या निधीसाठी पैसे नाही”

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now