भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आले आहेत, जे कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडले आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे 2013 मध्ये प्रदर्शित झालेला ‘कालीमन्नू’. मल्याळम भाषेत बनलेला हा चित्रपट अभिनेत्रीच्या(Actress) लाइव्ह डिलिव्हरीमुळे वादात सापडला होता. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाबद्दल सांगत आहोत, चला तर मग जाणून घेऊया काय आहे संपूर्ण कथा.
‘कालीमन्नू’ ब्लेसीने दिग्दर्शित केला होता आणि त्यात श्वेता मेनन, बिजू मेनन, सुहासिनी आणि वैस्ता मेनन यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट 22 ऑगस्ट 2013 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा मुंबईतील मीरा या स्ट्रीट डान्सरभोवती फिरते, जिला मोठ्या पडद्यावर यायचे आहे. मात्र चित्रपट निर्माते भूमिका देऊन तिचा गैरफायदा घेतात.
अस्वस्थ झालेल्या मीराला आत्महत्या करायची आहे, पण याच काळात श्याम नावाचा टॅक्सी ड्रायव्हर तिच्या आयुष्यात येतो आणि तिचे आयुष्यच बदलून जाते. दोघांचे लग्न होते आणि मीराचे करिअरही पुढे सरकू लागते. मात्र त्याच दरम्यान श्यामला रस्ता अपघातानंतर ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. मीरा एकटीच कृत्रिम गर्भाधानाद्वारे आई होण्याचा निर्णय घेते. पण तिला तिच्या पालकत्वाच्या हक्कांसाठी लढा द्यावा लागतो, कारण तिच्या मातृत्वाच्या तंत्राबद्दल मीडियामध्ये तिच्यावर जोरदार टीका होऊ लागते.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्वेता खरोखरच प्रेग्नंट होती. त्यामुळे निर्मात्यांनी तिची लाईव्ह डिलिव्हरी दाखवण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शक ब्लेसी यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांनी सांगितले होते की, जेव्हा श्वेता पाच महिन्यांची गरोदर होती, तेव्हापासून त्यांनी तिच्या प्रसूतीच्या सीक्वेन्सचे शूटिंग सुरू केले होते. श्वेतालाही लाईव्ह डिलिव्हरी दाखवायला हरकत नव्हती.
चित्रपटाचा कालावधी सुमारे 3 तासांचा होता, परंतु त्यात फक्त 45 मिनिटांचा श्वेता मेननचा डिलिव्हरी सीक्वेन्स होता. शूटिंगसाठी मुंबईतील नानावटी हॉस्पिटलच्या लिव्हर रूममध्ये तीन कॅमेरे बसवण्यात आले आणि श्वेताचे पती श्रीनिवासन मेननही तिथे उपस्थित होते. त्यांच्याशिवाय डॉक्टर, परिचारिका आणि हॉस्पिटलच्या प्रोडक्शन टीमचे तीन सदस्यही तिथे उपस्थित होते.
या एका दृश्यासाठी निर्मात्यांनी हा चित्रपट 6 महिन्यांसाठी रोखून धरला होता. पण जेव्हा तो पडद्यावर आला तेव्हा त्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे, समीक्षकांनी हा चित्रपट समाजाला संदेश देणारा चित्रपट असल्याचे म्हटले आहे, पण पैशासाठी श्वेतावर लाइव्ह डिलिव्हरी शूट केल्याचा आरोप होता. त्यामुळे हा चित्रपट वादात सापडला होता.
नंतर श्वेताने स्पष्ट केले की तिने डिलिव्हरी सीनसाठी कोणतेही पैसे घेतले नाहीत. तिच्या म्हणण्यानुसार, हा सीन चित्रपटाची मागणी होता, त्यामुळे तिने ते करण्यास कोणताही आक्षेप नोंदवला नाही. मात्र प्रेक्षकांकडून या चित्रपटाला म्हणावे असे प्रेम मिळाले नाही.