बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्दर्शक आणि निर्माता आहेत ज्यांनी अनेक ऍक्शन चित्रपट बनवले आहेत. याच यादीत असेल एक नाव घेतले जाते ज्याने रिस्क घेऊन चित्रपट केले. तो म्हणजे दिग्दर्शक आणि निर्माता साजिद नाडियादवाला हा आहे. साजिदने अनेक सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले आहे. ज्यामध्ये सलमान खानच्या ‘किक’, ‘सुलतान’ तर अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल’ तसेच ‘हीरोपंती’ अशा अनेक चित्रपटाचा समावेश आहे.
साजिद नाडियादवालाचे जितके व्यवसायिक जीवन यशस्वी आहे तेवढे त्यांच्या वैयक्तिक जीवन यशस्वी झाले नाही. साजिदचा जन्म १८ फेब्रुवारी रोजी म्हणजेच आजच्या दिवशी झाला. या त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या खाजगी जीवनाबद्दल जाणून घेऊ या.
आपल्या सर्वांचा माहिती आहे की, साजिद नाडियादवाला आणि अभिनेता गोविंद हे खूप जवळचे मित्र आहे. त्याचबरोबर दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती आणि साजिदचे काही काळ एकमेकांवर प्रेम होते. मात्र या प्रेमामागचा खरा दुवा गोविंदा होता. गोविंदामुळेच दिव्या भारती आणि साजिदची भेट झाली.
खरतर साल १९९० मध्ये गोविंदा आणि दिव्या भारती फिल्मसिटीमध्ये ‘शोला और शबनम’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्याकाळात दिव्या भारती इतकी सुंदर दिसतच की, प्रत्येकजण तिच्या प्रेमात पडत होते. असेच काहीसे साजिद सोबतही झाले. एके दिवशी साजिद गोविंदाला भेटण्यासाठी शूटिंग सेटवर पोहोचला होता. त्यादरम्यान गोविंदाने साजिदची दिव्याशी ओळख करून दिली. साजिदला दिव्या पहिल्या नजरेतच खूप आवडली. त्यानंतर साजिद रोज गोविंदाला भेटण्याच्या बहाण्याने सेटवर जायचे. त्यानंतर हळूहळू साजिद-दिव्या ओळख वाढली. त्या ओळखीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले.
साजिद दिव्याने एकमेकांना प्रेमाची कबुली ही दिली. त्यानंतर या दोघांनीही एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. खरंतर हा निर्णय थोडा घाईचा होता, पण त्यामागे एक मनोरंजक किस्साही आहे. साजिदच्या मतानुसार, ‘दिव्याने त्याच्याशी लवकरच लग्न करण्याची मागणी केली होती. १९९२ मध्ये १५ जानेवारीला दिव्याने त्याला सांगितले की, चला लग्न करूया.’
मात्र यामागे कारणही तसेच होते. दिव्याचे नाव तिच्या आणखी एका सहकलाकाराशी जोडले जात होते, ज्यामुळे दिव्या खूप नाराज होती. म्हणूनच या अफवांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तिला साजिदसोबत लग्न करायचे होते. त्यानंतर साजिद आणि दिव्याने १० मे १९९२ रोजी लग्न केले. वर्सोव्यातील साजिदच्या तुलसी अपार्टमेंटमध्ये काजीने त्यांचे लग्न लावून दिले होते. मात्र त्याअगोदर दिव्याला इस्लाम धर्माचा स्वीकार करावा लागला. तिचे दिव्या नाव बदलून ‘सना’ ठेवण्यात आले.
त्याचबरोबर साजिदने सांगितले होते की, “लग्न झाल्यानंतर आम्ही हे लग्न लपवून ठेवले. कारण नुकतीच दिव्याच्या करिअरची सुरुवात झाली होती. लग्नाचे प्रकरण बाहेर आले असते तर कदाचित निर्माते नाराज झाले असते.” मात्र एवढे करूही दिव्या आणि साजिदचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकू शकले नाही.
लग्नानंतर वर्षभरातच दिव्याचा अपार्टमेंटमधील घरातून खाली पडून मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत साजिदवरही अनेक आरोप केले होते. परंतु त्याच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचे पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे हे प्रकार बंद करण्यात आला.