बॉलीवूड अभिनेत्री आपल्या अदाकारीने चाहत्यांची मने जिंकतात. तसेच आपल्या अभिनयाने त्यांनी मनात आपले स्थान निर्माण करतात. अशी एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आहे, जिने आपल्या अदाकारीने चाहत्यांना वेड लावले. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने ती रातोरात सुपरस्टार झाली. ती अभिनेत्री म्हणजे ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील प्रेमची सुमन म्हणजेच अभिनेत्री भाग्यश्री.
भाग्यश्रीच्या अभिनय कारकिर्दीत पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’ हा होता. या चित्रपटात तिने सलमान खान सोबत रोमान्स केला. सलमान खानसोबत केलेल्या या चित्रपटामुळे भाग्यश्री रातोरात स्टर बनली. तसेच हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला. यातील गाण्यांनी चाहत्यांच्या मनात अनेक दिवस राज्य केले. ही जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले.
भाग्यश्रीने हिमालय दासानीसोबत लग्न केले आहे. खरंतर तिच्या लग्नामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण भाग्यश्रीने लग्न केल्याच्या अचानक बातम्या येऊ लागल्या. या दोघांचे प्रेम कसे जुळले किंवा हे दोघे एकमेकांना किती ओळखतात याबाबत कोणालाही माहिती नव्हती. याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता राहिली आहे.
Agar dil mein basi ho beintehaan mohabbat, to khulke kaho, maine pyaar kiya! Bilkul Bhagyashree aur Himalay ki tarah.
Miliye inse, #SmartJodi mein, shuru ho raha hai, is Shanivaar raat 8 baje, sirf StarPlus par.@bhagyashree123 #HimalayDassani pic.twitter.com/PBkFCxcrLd— StarPlus (@StarPlus) February 24, 2022
मात्र लग्न झाल्यानंतर भाग्यश्री खूप वर्ष चित्रपट सृष्टीपासून लांब होती. भाग्यश्रीने आपल्या व्यवसायिक कारकीर्दीत खूप मोठा गॅप घेतला होता. मात्र लवकरच ती आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे. भाग्यश्री आणि पती हिमालय दासानी हे दोघे ‘स्मार्ट जोडी’ या कार्यक्रमात दिसणार आहेत. नुकताच या शोचा प्रोमो व्हायरल झाला आहे.
या शो प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या शोमध्ये भाग्यश्री आणि पती हिमालय दासानीला होस्ट मनीष पॉल असा काही प्रश्न विचारतो ज्यामुळे ती खूप लाजते. वय वर्ष ५३ असलेली भाग्यश्री ही दोन मुलांची आई आहे.‘स्मार्ट जोड़ी’ च्या प्रोमोमध्ये आपल्याला भाग्यश्री आणि हिमालय दासानी यांच्यातील प्रेम पाहायला मिळते.
या व्हिडिओमध्ये मनीष भाग्यश्रीला विचारतो की, “‘मैने प्यार किया’ या चित्रपटानंतर तुम्ही चित्रपट केले नाहीत.” तेव्हा भाग्यश्री म्हणते की,“ मला हिमालयवर प्रेम झाले.” त्यानंतर हिमालय असे म्हणतो की, “आम्ही अजूनही हनिमून करत आहोत.” यावर मस्ती करत मनीष म्हणतो की, “मग तिसऱ्या मुलाचा प्लॅनिंग कधी करणार?” यावर भाग्यश्री लाजते.
त्यानंतर हिमालय पुढे म्हणातो की, “मी तर यासाठी दररोज ॲप्लिकेशन देतो.” हिमालयचे बोलणे ऐकून भाग्यश्री पुन्हा एकदा लाजते आणि त्याला शांत बसण्यास सांगते. याच दरम्यान भाग्यश्री आणि हिमालय दासानीचा शोमध्ये रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.