रॉकिंग स्टार यशचा ‘केजीएफ २’ (KGF 2) हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. दररोज या चित्रपटासंबंधित अनेक बातम्या माध्यमात समोर येत आहेत. तर चाहतेही चित्रपटासंबंधित आणि त्यामधील कलाकारांसंबंधित प्रत्येक माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहेत. तर आज ‘केजीएफ २’ मध्ये रॉकीभाई अर्थात यशच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्चना जोईसबाबत जाणून घेऊया.
‘केजीएफ २’ (KGF 2) मध्ये रॉकीभाईच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अर्चना जोईस. केवळ २७ वर्षाच्या वयातच अर्चनाने चित्रपटात आपली भूमिका उत्तमपणे साकारली आहे. पडद्यावर यशच्या आईची भूमिका साकारणारी अर्चना यशपेक्षा ९ वर्षांनी लहान आहे. परंतु, आपल्या सहजसुंदर अभिनयाद्वारे तिने सर्वांचेच मन जिंकून घेतले आहे.
‘केजीएफ २’ (KGF 2) मध्ये साध्या भूमिकेत दिसणारी अर्चना खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. अर्चना तिच्या इन्स्टाग्राम हँडलद्वारे शेअर करण्यात येणाऱ्या फोटोंद्वारे याची प्रचिती येते. तिने सोशल मीडियावर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. तर तिच्या या फोटोंना चाहत्यांद्वारेही खूप पसंती देण्यात येते.
अर्चना जोईस दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तसेच ती एक क्लासिकल डान्सरसुद्धा आहे. अर्चनाने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले. परंतु, ‘केजीएफ 2’ (KGF 2) या चित्रपटामुळे तिला फार लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील शांतम्मा या भूमिकेमुळे ती एका रात्रीत स्टार झाली.
‘केजीएफ’मध्ये तिची भूमिका जास्त मोठी नव्हती. परंतु तरीही तिने आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. तर आता ‘केजीएफ २’ (KGF 2) मध्ये अर्चना जास्तकरून चित्रपटाच्या कथानकाच्या फ्लॅशबॅकमध्ये दिसून आली. अर्चनाबाबत आणखी एक गोष्ट सांगायचे झाल्यास ती विवाहित असून तिच्या पतीचे नाव श्रेयस उथुप्पा असे आहे.
दरम्यान, ‘केजीएफ २’ (KGF 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने कमाईच्या बाबतीत आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. आतापर्यंत चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने २३८.७० कोटींच्यावर कमाई केली आहे. तर येणाऱ्या काळात प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळत राहिला तर लवकरच तो २५० कोटींचा आकडा गाठेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘या’ कारणामुळे दाक्षिणात्य चित्रपटांसमोर बॉलिवूड चित्रपट टिकत नाहीत; संजय दत्तने सांगितले कारण
Rinku Rajguru Photo : रिंकू राजगुरूच्या साडी लूकवर चाहते झाले फिदा; म्हणाले, क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो…
आता सिनेमागृहातही वाजणार ‘भोंगा’; मनसेने मोठी घोषणा करत तारीखही सांगीतली