बॉलिवूड अभिनेत्री आमना शरीफ सध्या तिच्या ‘डॅमेज्ड ३’ या आगामी वेबसीरीजमुळे माध्यमात चर्चेत आहे. ‘डॅमेज्ड ३’ या वेबसीरीजद्वारे आमनाने डिजिटल डेब्यू केला आहे. दीर्घकाळानंतर ती पुन्हा या वेबसीरीजद्वारे अभिनयात परतली आहे. यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना तिने तिच्या वेबसीरीजबद्दल तसेच तिचे करिअर, ब्रेक, निराशा, लग्न, मातृत्व अशा अनेक गोष्टींबाबात मोकळेपणाने बोलली (Aamna Sharif About Career)आहे.
या मुलाखतीदरम्यान बोलताना आमनाला विचारण्यात आले की, बॉलिवूडमधील तिचे करिअर हवे तसे पुढे गेले नाही. यामागचे काय कारण असेल? यावर उत्तर देताना आमनाने सांगितले की, ‘जेव्हा मी चित्रपट करत होते तेव्हा मला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. मी कोणत्याही सिनेसृष्टीशी संबंधित घराण्यातील नाही. त्यामुळे मी कशाप्रकारच्या भूमिका निवडावे हे सांगण्यासाठी कोणीच नव्हते. यामुळे मला करिअरमध्ये योग्य मार्ग मिळाला नाही’.
तिने पुढे सांगितले की, ‘एक विलेन या चित्रपटानंतर मला अनेक ऑफर्स मिळाले. पण तोपर्यंत मी आई झाले होते. तसेच मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला होता की, मला ब्रेक घ्यायला हवे आणि त्यानुसार मी काही काळासाठी अभिनयापासून दूर गेले. माझ्या अभिनयाचा प्रवासही काही सोपा नव्हता. अनेक लोकांनी मला म्हटले की, आता तुझे करिअर संपले आहे. तुला आता काम मिळणार नाही कारण तुझे लग्न झाले आहे आणि तू एका बाळाची आईसुद्धा झाली आहेस’.
आमनाने पुढे म्हटले की, ‘लोकांच्या या बोलण्यामुळे माझ्या आत्मविश्वासाला ठेस पोहोचला. पण नंतर मला वाटले की, मी हार मानू शकत नाही. मला स्वतःला हे सिद्ध करावे लागेल की लग्न किंवा मुलांमुळे एका अभिनेत्रीचे करिअर संपू शकत नाही’. आमनाने स्वतःला सिद्द करून दाखवण्यासाठी जिद्दीने पुढे आली आहे. तसेच अभिनयातून ब्रेक घेतल्याचाही तिला कोणताच पश्चात्ताप नसल्याचे तिने यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, आमनाने ‘कहीं तो होगा’ या मालिकेद्वारे तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेतील कशिश या भूमिकेमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली. या मालिकेनंतर तिने ‘कसौटी जिंदगी की’, ‘कुमकुम’, ‘काव्यांजली’, ‘करम अपना अपना’ यासारख्या अनेक मालिकेत काम केले आहे. तसेच ‘आलू चाट’, ‘एक विलन’ यासारख्या चित्रपटातही ती दिसली.
महत्त्वाच्या बातम्या :
अल्लू अर्जुनचा चित्रपट बकवास, मनोरंजनाच्या नावाखाली मुर्खपणा; पद्मश्री गरिकापती नरसिंह निर्मात्यांवर संतापले
लतादीदींच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून लाडक्या नातीने केली प्रार्थना; मंदिरातील फोटो झाले व्हायरल
लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील ते वेदनादायक तीन महिने; मृत्यूच्या दारातून आल्या होत्या परत