सिनेसृष्टीत सर्वोच्च पुरस्कार म्हणून घोषित असणाऱ्या यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एक विचित्र घटना घडली आहे. या पुसस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथने सुत्रसंचालक क्रिस रॉकला स्टेजवर जाऊन सनसनीत कानाखाली लावली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सुत्रसंचालक क्रिस रॉक स्टेजवर होस्ट करत होता. यावेळी अभिनेता विल स्मिथसोबत सगळेजण उपस्थित होते. मध्येच बोलता बोलता क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेटवर घाणेरडा जोक मारला. त्यामुळे यावर चिडून स्मिथ स्टेजवर गेला आणि त्याने क्रिस रॉकच्या कानाखाली लगावली.
तसेच “माझ्या पत्नीचे नाव पुन्हा तुझ्या तोंडातून घेऊ नकोस” असे क्रिसला सांगितले. यावर क्रिसने ही मी अस करणार नसल्याचे म्हणले. या सर्व घटलेल्या प्रकारामुळे दोन मिनीट पुरस्कार सोहळ्यात शांतता पसरली होती. परंतु पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
#BREAKING
In a shocking event
Will Smith punched to Chris Rock at Oscars 2022 in live streaming, by saying 'keep my wife's name out of your fuckin mouth'.
Chrish rock was cracking joke on wife of Will Smith
Can't confirm now it was real or scripted event.#Oscars2022 pic.twitter.com/5kETItGwRV— NEO (Only Truth) (@Infinity_Tarun) March 28, 2022
दरम्यान दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ऑस्कर पुरस्काराचे आयोजन लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये करण्यात आले आहे. यावर्षी विल स्मिथला किंग रिचर्डसाठी नामांकित करण्यात आले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
मात्र पुरस्कार सोहळ्यात स्मिथने सुत्रसंचालक रॉकच्या कानाखाली लावल्यामुळे तो याच कारणासाठी सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून ट्विटरवर #Unacceptable, #Apologize, #Oscars हे हॅशटॅग ट्रेंड सुरु झाले आहेत.
अनेकांनी तर या प्रकारावर शंका व्यक्त करत हे सर्व प्रिप्लॅन असल्याचे म्हटले आहे. तसेच काहींनी स्मिथचे आपल्या पत्नीवर किती प्रेम आहे हे पाहून त्याचे कौतुक केले आहे. परंतु अद्याप या घटनेनंतर विल स्मिथने कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका, ‘या’ डॉक्युमेंट्रीला मिळालं नामांकन
एक कॅचने पळवला हातातोंडातील घास, ‘त्या’ खेळाडूने पुढच्या आठ चेंडूत सामनाचं पलटवला
आता हिंदू देखील अल्पसंख्याक होणार; मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली ‘ही’ माहिती
मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या मौलानाला कपडे काढून चोप चोप चोपला; पहा कुठे घडला हा प्रकार…