‘लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मुंबईतील परप्रांतीय मजुरांना रेल्वेची मोफत तिकीटे काढून दिली. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन बाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं, सांगून त्यांनी काँग्रेसनेच देशभरात कोरोना पसरवल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी केला होता.
मोदी यांनी केलेल्या या विधानानंतर राज्यात काँग्रेसने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस राज्यभरातील भाजपच्या कार्यालयांसमोर आंदोलन करत आहे. मोदी यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे अभिनेते सोनू सोदू यांनीदेखील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांच्या विधानावर भाष्य केले आहे. ‘कोरोनाच्या पहिल्या भीषण टप्प्यात मुंबईतील हजारो उत्तर प्रदेश, बिहारसह परप्रांतीय मजुरांना वेळीच त्यांच्या राज्यांमध्ये पाठविले नसते तर शेकडो जणांचा भुकेने मृत्यू झाला असता,’ असे त्यांनी म्हंटले.
पुढे बोलताना ते म्हणले, ‘चारपाच महिन्याची बाळे घेऊन महिला यायच्या, आम्हाला गावी जाऊ द्या अशी विनवणी करायच्या. तीन हजार लोकांना स्थलांतरित करण्याची परवानगी मिळाली तर सहा-सहा हजार लोक येऊन उभे राहायचे. त्यांना तेव्हा पाठविले नसते तर ते अन् त्यांची मुलं रस्त्यावर मरून पडली असती.’
दरम्यान, गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत सोनू सूद देवदूतासारखे स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी धावले. दिवसरात्र खपत त्यांनी हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवले. जमेल त्या मार्गाने ते लोकांची मदत करत राहिले. तसेच कोरोनाच्या दुस-या लाटेतही सोनू सूद रात्रंदिवस लोकांच्या मदतीसाठी धावले.
तसेच सोनू सूद यांनी हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी आणि चीनी सिनोमात काम केलं आहे. 1999 साली ‘कल्लाझागर’ या तामिळ सिनेमापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सोनू सूद हे मुळचे पंजाबचे असून गेल्या काही वर्षांपासून ते मुंबईत राहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Third covid wave: ‘या’ महिन्यात संपणार कोरोनाची तिसरी लाट, ICMR ने केली मोठी भविष्यवाणी
हिंदुस्थानी भाऊला पालकांनी झापले; म्हणाले, ‘तू सातवी शिकलेला आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना काय सल्ले देतोस’
१ लाखाची लाच घेताना पकडलं तरी महिला अधिकाऱ्याचे हसू थांबेना; म्हणाली, प्रसादाला नाही कसं म्हणू
मेळाव्यात चंद्रकांत पाटील म्हणले, ‘राज्यात १० मार्चनंतर भाजप सरकार’, बाहेर येताच पलटी मारत केली सारवासारव