Share

अभिनेता सिद्धार्थ जाधवची पत्नी घटस्फोट घेणार?

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.परंतु  यावेळी ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.सोशल मिडीयावर सिद्धार्थ आणि तृप्ती हे दोघे विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

हे दोघेही 2007 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते.त्यांना इरा आणि स्वरा अशा दोन मुली आहेत. या दोघांनी ‘झलक दिखला जा’ या टीव्ही शोमध्ये सहभाग घेतला होता. सिद्धार्थ कायम त्याच्या पत्नीचे तोंडभरून कौतुक करत असतो. या शोमध्येही त्याने त्याच्या पत्नीचे कौतुक केले होते.

दरम्यान, आता या दोघांच्या घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरु आहे. तृप्तीने इन्स्टाग्रामवरून जाधव हे आडनाव हटवून अक्कलवार असे आडनाव टाकले आहे. त्यामुळेच हे दोघे वेगळे होणार का? असा सवाल सगळ्यांनाच पडला आहे.काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि त्याच्या मुली सुट्टीसाठी गेल्या होत्या.

तेव्हा सिद्धार्थने  फोटो सोशल मिडीयावर शेअर केला होता.त्यावेळी या फोटोत तृप्ती का नाही, असा सवाल सगळ्यांना पडला होता. या दोघांच्या घटस्फोटाची जरी चर्चा होत असली तरी यावर दोघांनीही  कोणतीच प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने आमच्यात सगळ काही ठीक असल्यचे सांगितले होते.

‘ मागील दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती एकमेकांपासून दूर राहत आहे.या दोघांनी याबद्दल कधीच कोठे जाहीरपणे सांगितले नाही. त्याचबरोबर या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणता खुलासा केला नाही असे इ टाइम्सने वृत्त दिले आहे. या दोघांमध्ये सगळ काही ठीक असेल, अशी आशा चाहते व्यक्त करत आहे.

त्याने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत: चे अस्तित्त्व तयार केले आहे. गोलमाल, गोलमाल रिटर्नस आणि सिम्बा अशा चित्रपटात महत्त्वाची  भूमिका बजावली आहे. लवकरच तो दे धक्का 2 या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे आणि शिवाजी साटम हेदेखील असणार आहेत.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now