Share

15 कोटींसाठी केला अभिनेते सतीश कौशिक यांचा खून, फार्महाऊसच्या मालकानेच केला घात

सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सतीश कौशिक ज्या फार्महाऊसमध्ये थांबले होते, त्या फार्महाऊसचे मालक विकास मालू यांच्यावर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत आणि हे प्रश्न त्याच्या स्वतःच्याच पत्नीने उपस्थित केले आहे. पत्नी सानवी सालू हिने दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहून सतीश कौशिक यांच्या मृत्यूमध्ये पतीचा हात असल्याचे म्हटले आहे.

होय, गुरुग्रामच्या फार्महाऊसचे मालक आणि कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू यांची पत्नी सानवी सालू हिने दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहून सतीश कौशिक यांच्या मृत्यूमध्ये पतीचा हात असल्याचे म्हटले आहे. 15 कोटी रुपयांवरून दोघांमध्ये वाद झाल्याचे त्यांनी सांगितले होते. आता याप्रकरणी दिल्ली पोलिसांचे वक्तव्य समोर आले आहे.

अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आल्यावर दिल्ली पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी विकास मालूच्या पत्नीने लावलेल्या आरोपांचा तपास सुरू केला आहे. दक्षिण पश्चिम जिल्ह्यातील एका निरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याला संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. यासोबतच सानवी मालूचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिस तिला पोलीसठाण्यात बोलवण्यात येणार आहे.

सानवी मालूच्या वक्तव्यानंतर ६६ वर्षीय सतीश कौशिक वयाच्या मृत्यू प्रकरणात नवा यू-टर्न आला आहे. त्याच्या सर्व चाहत्यांनाही धक्का बसला आहे. प्राथमिक तपासात सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. यात काही संशयास्पद नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. मात्र, यादरम्यान फार्महाऊसचे मालक विकास मालू यांच्या पत्नीने त्यांच्यावर संशय या प्रकरणात नवा यू-टर्न आणला आहे

सानवी मालूने संशय व्यक्त केला की विकास मालूने सतीश कौशिक यांना चुकीचे औषध दिले असावे जेणेकरून अभिनेत्याला 15 कोटींसारखी मोठी रक्कम परत करावी लागू नये. त्यांनी पोलिसांना पत्र लिहून या प्रकरणात तपास करण्याची विनंती केली. विकास मालूची पत्नी सानवी मालू हिने दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहून पती विकास मालूचा सहभाग असल्याचे म्हटले आहे.

यात पतीचा हात असावा, असा संशय तिला होता. तिने सांगितले की, एकदा दोघांमध्ये 15 कोटींवरून भांडण झाले होते. दोघेही जुने मित्र आहे. एकदा अभिनेताही त्याचे 15 कोटी मागायला आला होता. या मोठ्या रकमेवरून दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा विकासने सतीश कौशिक यांन सांगितले की नंतर पैसे देईल.

https://twitter.com/ANI/status/1634778321069260801?s=20

विकास मालू आणि सतीश कौशिक यांच्या या बातम्यांची दुसरी बाजू अशी आहे की, विकास मालू आणि त्यांच्या पत्नीमध्ये काहीही चांगले नाही. सानवीने दोन महिन्यांपूर्वीच पतीवर बलात्काराचा आरोप केला होता आणि गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे, वैयक्तिक वैमनस्यातून या प्रकरणात बळजबरीने ओढले जात असल्याची शक्यता काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सतीश आणि विकास खूप चांगले मित्र आहेत. दोघांची अनेक वर्षांची मैत्री आहे. मैत्री टिकवण्यासाठी तो खास मुंबईहून गुरुग्रामला आला होता.

महत्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीने केला उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम! शिवसेनेचा मोठा नेता फोडत पाडले खिंडार
राष्ट्रवादीने पुन्हा खुपसला उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर! भलेमोठे खिंडार पाडत दिला जोरदीर दणका
काँग्रेसला मोठा धक्का! राज्यातील सर्वात मोठ्या नेत्याचे अचानक निधन; राहूल गांधी म्हणाले…

आर्थिक क्राईम ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now