Santosh Juvekar: दोन वर्षानंतर महाराष्ट्रात ढाक्कुमाकुमचा आवाज येतोय. राज्यभरात आज मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना याबाबत मराठी इंडस्ट्रीतील रांगडा अभिनेता संतोष जुवेकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. सध्या ती पोस्ट सर्वत्र चर्चेत आहे.
संतोष जुवेकरने दहीहंडी निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला. त्याला कॅप्शन देताना संतोष जुवेकर लिहिले आहे की, ‘२ दिवसांवर गोपाळ अष्टमी आलीये. गेली २ वर्षे गोपाळ काला उत्सव कोविडमुळे साजरा करता आला नव्हता.’
‘या वर्षी उत्साहाचा जोर आणि जल्लोष काही औरच आहे. सगळे गोपाळ, गोपिका दहीहंडी फोडण्याची जय्यत तयारी करतायेत, कसून सराव चालाय.. कालच जवळचे मित्र मनोज चव्हाण यांच्यामुळे गाजलेल्या जय जवान (मुंबई) गोविंदा पथकाचा सराव पाहण्याचा योग आला.
पुढे त्याने आपला अनुभव सांगत लिहिले की, ‘एक क्षण वाटलं आपण पण घुसावं, पण ते एवढं सोप्प नाही. हे लगेच जाणवलं. पुढे गोविंदा पथकांना शुभेच्छा देताना संतोष जुवेकर म्हणाला की, ‘सोबत असणाऱ्या लहान मुलांची काळजी घ्या.
पुढे दहीहंडी आपला सण आहे. तो सणासारखाच साजरा करा. त्याची स्पर्धा करू नका, असे आवाहन संतोष जुवेकरने सगळ्यांना केले आहे. संतोष जुवेकर गणेश उत्सव, दहीहंडी यांवर आधारित सिनेमांमध्ये झळकला आहे.
संतोष जुवेकर उत्सवप्रेमी अभिनेता आहे. मात्र दहीहंडी फोडण्याची जी स्पर्धा आजकाल वाढते आहे. अनेक मंडळे लाखोंची बक्षीस जाहीर करतात. त्यामुळे स्पर्धा वाढली. त्यातून काही गोविंदांनी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावर अभिनेत्याने परखड भाष्य केल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या-
Raid on lodge in Jalgaon : जळगावात पोलिसांची लॉजवर रेड, आक्षेपार्ह अवस्थेत सापडलेल्या १३ मुलींनी केला धक्कादायक दावा..
प्रसिद्ध व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं? वाचा अंगावर काटा उभा राहिलं असा भयानक घटनाक्रम
राजू श्रीवास्तवांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती आली समोर; डॉक्टरांनी सोडली आशा, अन्…