Share

अभिनेता राजपाल यादवने उकळली लाखो रूपयांची खंडणी! बाॅलीवूडमध्ये खळबळ

बॉलिवूडमध्ये अगदी बोटावर मोजण्याइतके अभिनेते हे विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यामध्ये अभिनेता राजपाल यादव याचे नाव हमखास घेतले जाते. त्याच्या विनोदी अभिनयाने त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. मात्र, आता हाच राजपाल यादव अडचणीत सापडला आहे.

राजपाल यादव याने त्याच्या विविध भूमिकांमधून आपल्याला भरभरून आनंद आणि हास्य दिले आहे. एवढेच नाही तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया २’ या चित्रपटातूनही त्याने आपल्याला हसवलं. मात्र सध्या त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

२० लाखांच्या फसवणुकी प्रकरणी इंदोर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदोरमधील बिल्डर सुरिंदर सिंग यांनी त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बिल्डरने सांगितले की, यादवने माझ्या मुलाला सिनेृष्टीत पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिला इतर गोष्टीत मदत करण्यासाठी माझ्याकडून २० लाख रुपये घेतले होते.

मात्र आतापर्यंत राजपाल यादवने माझ्या मुलाला कोणतेही काम मिळवून दिलेले नाही. तसेच त्याला सिनेसृष्टीत काम करण्यासाठी कोणती मदतही केलेली नाही, असा आरोप बिल्डर सुरिंदर सिंग यांनी केला. तसेच म्हणाला, राजपालला पैसे परत करण्यास सांगितले पण तो गायब झाला. तो फोन देखील घेत नाही.

त्यानंतर या सर्व प्रकरणाला कंटाळून त्या बिल्डरने इंदोरमधील तुकोगंज पोलिसात तक्रार दिली. माहितीनुसार, इंदोर पोलिसाकडे तक्रार नोंदवली असून राजपाल यादवला येत्या १५ दिवसात पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटिस बजावली आहे.

या प्रकरणाचा तपास करणारे, उपनिरीक्षक लालन मिश्रा यांनी सांगितले की, सुरिंदर सिंग यांनी गेल्या आठवड्यात या प्रकरणाची तक्रार दिली होती. याच आधारे राजपाल यादवला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात येत्या १५ दिवसात राजपाल यादव यांनी या प्रकरणावर उत्तर द्यावं असं नमूद करण्यात आलं आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now