Share

‘आता ठेचायची वेळ आलीये, केतकी सारख्या विकृत लोकांनी..,’ किरण माने यांनी स्पष्टच सांगितलं..

‘केवळ केतकीच नाही तर मनोरंजन विश्वात तिच्यासारखे असे अनेक विकृत भरलेत,’ असे खळबळजनक विधान अभिनेते किरण माने यांनी केले आहे. सध्या अभिनेत्री केतकी चितळे हि तिने केलेल्या एका पोस्टने चांगलीच चर्चेत आली आहे.  चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेबसूकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे.

केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय वर्तुळातही या प्रकरणावर वातावरण तापलेले आहे.  अनेक नेत्यांनी तिच्या पोस्टला विरोध केला आहे. तिला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे केतकी चितळेवर शाई फेक करण्यात आली आहे.

अशातच सोशल मिडियावर नेहमी चर्चेत असणारे किरण माने यांनी देखील यावर सविस्तर भाष्य केलं आहे. फेसबुक पोस्ट करत त्यांनी केतकीच्या पोस्टला कडाडून विरोध केला आहे. ‘आता ठेचायची वेळ आलीये,’ अशा आक्रमक शब्दात त्यांनी जाहीर निषेध नोंदवला आहे.

https://www.facebook.com/kiran.mane.9047/posts/10225225948383350

फेसबुक पोस्टमध्ये माने म्हणतात, ‘आता तुम्हाला सांगू इच्छीतो, अशा विकृत लोकांनी खच्चून भरलेल्या क्षेत्रात आम्ही करीयर करतोय. तुम्हाला ही प्रवृत्ती नविन असेल, आम्ही कित्येक वर्ष भोगतोय. विशेषत: जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या अनेक अभिनेत्री उन्माद आणि उच्छादाचा कळस करतात.’

पुढे माने म्हणतात, ‘आधी कुजबूज स्वरूपात अशा वल्गना चालायच्या…गेल्या पाचसहा वर्षांत सेटवर मोठ्या आवाजात उघडपणे सुरू झाल्या.. आता पोस्ट करण्यापर्यन्त मजल गेली ! त्यामुळे ही प्रवृत्ती आता ठेचायची वेळ आली आहे.’ मी स्वत: अशा दोन अभिनेत्रींचा जवळून अनुभव घेतलाय. त्यांच्या उन्मादानं बोलण्याला विरोध केला की ‘लेडीज कार्ड’ खेळून ‘गैरवर्तना’चे खोटे आरोप करतात.’

दरम्यान, ‘असह्य होऊन आपण बंड करून उठलो, तर त्याच अभिनेत्री नंतर पुरोगामी विचारांच्या नेत्यांचे, खासदारांचे कान भरून ‘उलट्या बोंबा’ कशा मारतात आणि आपले नेते त्यांची बाजू कशी घेतात, ते ही मी ‘याची देही याची डोळा ‘ पाहीलेय. मी भक्कम आहे. कुणाचा मिंधा नाही. पोटासाठी लाचार होणारा नाही. म्हणून पुरून उरलोय या विकृतांना. बाकी कलाकारांची काय घुसमट होत असेल कोण जाणे,’ असं माने यांनी म्हंटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
तुमच्या मालकांसह १७ पिढ्या खाली आल्या तरी मुंबई मराठी माणसाचीच राहील; उद्धव ठाकरे गरजले
‘केतकीसारख्या अनेक अभिनेत्री उन्माद अन् उच्छादाचा कळस करतात, त्यांना ठेचायची वेळ आलीय’
शिवसेनेच्या विराट सभेतील ‘हा’ क्षण ठरला लक्षणीय; वाचा नेमकं काय घडलं…

इतर ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now