बॉलिवूडमध्ये अफेयरच्या चर्चा सध्या नवीन नाहीत. अनेक कलाकारांनी एकमेकांना डेट देखील केले आहेत. काहींची प्रेम कथा ही लग्नात ही बदली आहे. तर काहींचे लग्न होऊन तुटले आहे. त्याचबरोबर लग्नानंतरच्या अफेयरची देखील चर्चा बॉलिवूडसाठी नवीन नाही. अशातच मागील काही वर्षांपूर्वी अभिनेता ऋतिक रोशन आणि पत्नी सुझान खानचा घटस्फोट झाला.
ऋतिक आणि सुझान यांचा घटस्फोट हा बॉलीवूडचा सर्वात महागडा घटस्फोट होता सुझानने ऋतिककडून जवळजवळ ५०० कोटींचे पोटगी घेतली होती. मात्र घटस्फोट होऊनही ऋतिक आणि सुझान हे दोघे अजूनही खूप चांगले मित्र आहेत. त्याचबरोबर सुझान ही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
नुकताच तिने एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला. जो सध्या चर्चेचा विषय बनला. कारण हा फोटो ऋतिकच्या कथित गर्लफ्रेंड सबा आझादचा आहे. इतकेच नव्हे तर सुझानने हा फोटो शेअर करत तिचे कौतुक देखील केले आहे. तिने हा फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून स्टोरी पोस्ट केली होती.
खरंतर हा फोटो मुंबईतील एका कॉन्सर्टमधील आहे. सुझानने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एक सुंदर संध्याकाळ! सबा तू सुपर कूल आहेस आणि अत्यंत प्रतिभावान आहेस.’ सुझानने सबाला मेन्शन करून ही स्टोरी पोस्ट केली होती. इतकेच नव्हे तर या स्टोरीला सबाने उत्तर देखील दिलेले आहे.
सबाने मेन्शन बॅक करत सूझानला उत्तर दिले की, ‘धन्यवाद सुझी, तू काल तिथे होतीस याचा मला आनंद आहे.’ या दोघींच्या या संवादामुळे हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.
याचबरोबर मागील काही दिवसांपूर्वी ऋतिक आणि सबा हे एकत्र दिसले होते. या दोघांचा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ऋतिक हा सबाचा हात पकडून हॉटेलमधून बाहेर येत होता. त्यानंतर हे दोघेही एकाच गाडीमध्ये बसून निघून गेले.
सबाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने २००८ मध्ये ‘दिल कबाडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मागील वर्षी सबा ही नेटफ्लिक्सवरील ‘फिल्स लाइक इश्क’ या सीरिजमध्ये दिसली होती. त्याचबरोबर ‘रॉकेट बॉइज’ या वेब सीरिजमध्ये ही तिने काम केले आहे.