भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपचे गोरखपुरचे खासदार रवी किशन (Ravi Kishan) त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच माध्यमात चर्चेत असतात. परंतु, सध्या रवी किशन यांचे कुटुंबीय कठिण काळातून जात आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी त्यांचा हा दुःख शेअर केला आहे.
रवी किशन यांनी ट्विटरवर एक ट्विट करत सांगितले की, त्यांच्या आईला कॅन्सर झाले आहे. तसेच सध्या त्यांच्या आईवर मुंबई येथील टाटा कॅन्सर रूग्णालयात उपचार सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रवि यांनी ट्विट करत लिहिले की, ‘मागील काही दिवसांपासून मी कठिण समस्यांना सामोरे जात आहे. माझ्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींच्या आरोग्याशी संबंधित अनेक संघर्ष सुरु आहे’.
‘नुकतीच माझी पूजनीय आई कॅन्सरच्या विळख्यात सापडली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबई येथील टाटा कॅन्सर रूग्णालयात उपचार सुरु आहे. महादेव कृपा करा. आई लवकर ठीक व्होवो. दरम्यान, रवी किशन यांच्या या ट्विटवर अनेकजण कमेंट करत रवी किशन यांचे सांत्वन करत आहेत. तसेच त्यांची आई लवकरात लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
https://twitter.com/ravikishann/status/1518464889068658691?s=20&t=MateJhxhT-ig8XcZks7rqQ
नुकतीच काही दिवसांपूर्वी रवि किशन यांचे मोठे भाऊ रमेश शुक्ला यांचे निधन झाले होते. दिल्लीतील एम्स रूग्णालयात ३० मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. रवि किशन आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही एक धक्कादायक घटना होती. यासंदर्भात स्वतः रवी किशन यांनी माहिती दिली होती.
https://twitter.com/ravikishann/status/1509059500271017984?s=20&t=MateJhxhT-ig8XcZks7rqQ
त्यांनी ट्विट करत लिहिले होत की, दुःखद बातमी.. आज माझे मोठे भाऊ रमेश शुक्ला यांचे एम्स रूग्णालयात दुःखद निधन झाले. अथक प्रयत्न करूनही मोठ्या भावाला वाचवू शकलो नाही. वडिलांच्या निधनानंतर मोठ्या भावाचे जाणे खूपच त्रासदायक आहे. महादेव तुम्हाला त्यांच्या श्रीचरणांमध्ये स्थान देवो. कोटी कोटी नमन. ओम शांती.
महत्त्वाच्या बातम्या :
रोहित शेट्टीच्या ‘Indian Police Force’ मध्ये ‘या’ अभिनेत्याची एंट्री, फर्स्ट लूक पाहून तुम्हीही व्हाल अवाक
मुलाच्या मृत्युनंतर ‘हे’ मोलाचे काम करत आहे सिद्धार्थ शुक्लाची आई, पाहून नेटकरीही झाले भावूक
संजय दत्त ‘या’ अभिनेत्रीला म्हणाला सेक्सी; अजय, सलमान, अक्षयबाबतही केलं मोठं वक्तव्य