Share

अल्लू अर्जुनच्या पावलावर पाऊल टाकत मुलीनेही चित्रपटसृष्टीत केले पदार्पण, ‘या’ चित्रपटात झळकणार

सध्या चित्रपट सृष्टीत अनेक नवनवीन कथा घेऊन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हिंदी चित्रपटापेक्षा साऊथच्या चित्रपटाचा सध्या बोलबाला सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी एक साऊथ चित्रपट आला होता. जो अनेक भाषेत प्रदर्शित झाला. इतकेच नव्हे तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला.

 

हा साऊथ चित्रपट म्हणजे चाहत्यांचा लाडका चित्रपट ‘पुष्पा द राइज.’ या चित्रपटाने सर्व सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनाच वेड लावले होते. इतकेच नव्हे तर राजकारणात ही या चित्रपटाची क्रेझ दिसून आली. या चित्रपटामुळे अभिनेता अल्लू अर्जुन देखील चर्चेत आला होता.

 

मात्र सध्या अल्लू अर्जुन बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ते म्हणजे अल्लू अर्जुननंतर आता त्याची लहान मुलगी देखील चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. आपल्याला माहितीच आहे की, अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोमवार (२१ फेब्रुवारी) प्रदर्शित झाले.

याच चित्रपटात अल्लू अर्जुनची मुलगी देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मागील काही दिवसांपासून सामंथा रुथ प्रभू देखील ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात तिने एक आयटम साँग केले होते. आता समांथा आगामी चित्रपट ‘शकुंतलम’ या मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक देखील प्रदर्शित झाला आहे.

 

त्याचबरोबर सामंथाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर ‘शकुंतलम’ या चित्रपटातील लूक शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये सामंथा ही शकुंतलाच्या लूकमध्ये दिसत आहे. याच चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अरहा देखील दिसणार आहे. ती चित्रपटात प्रिंस भरत ही भूमिका साकारणार आहे. ‘शकुंतलम’ चित्रपटात सामंथासोबत देव मोहन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शकुंतलाच्या भूमिकेत समांथा दिसणार आहे. तर अभिनेता देव मोहन दुष्यंतची भूमिका साकारणार आहे.

सामंथाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी तिने ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात ‘ऊ अंटवा’ या गाण्यावर डान्स केला होता. तिने हे गाणं सुपरहिट झालं. यानंतर ती ‘शकुंतलम’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यानंतर ‘यशोदा’ आणि ‘काठू वाकुला रेंडू काधल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

 

तसेच सामंथाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तिने २०१७ मध्ये अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न केले होते. मात्र त्यांच्या संसार जास्त दिवस टिकू नाही शकला. २०२१ मध्येच या दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांचा अवघ्या ३ वर्षाचा संसार झाला.

 

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now