नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आले आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला भरघोस यश मिळेले असून कॉंग्रेसला मात्र मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसच्या कामगिरीवर विचारमंथन करण्यासाठी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
तसेच या बैठकीला मुकुल वासनिक, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, भुपेश बगेल यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. काँग्रेसच्या प्रभारी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षत्येखाली रविवारी दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली.
यामध्ये काँग्रेसचं नेतृत्वा पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. राहुल गांधींनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा असून संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत, पुढचा अध्यक्ष त्यातूनच ठरवला जाईल, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले.
दरम्यान, बैठकीतील महत्त्वाची बाब म्हणजे सोनिया गांधींनी राजीनामा सादर केला. मात्र पक्षाच्या सर्व नेत्यांनी सोनिया यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे. याचबरोबर “काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया या आमचे नेतृत्व करतील आणि भविष्यातील निर्णय त्याच घेतील. आम्हा सर्वांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे”, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
तसेच याबाबत कर्नाटकमधील काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनीही ट्विट करत काँग्रेसचं नेतृत्वा पुर्णपणे राहुल गांधी यांच्याकडे सोपवावी, अशी मागणी केली आहे. ‘जिंकणे किंवा हरणे, हा राजकारणातील एक भाग आहे. पण हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप जनतेची दिशाभूल करत आहे. हे राजकाराणासाठी धोकादायक आहे, असे अशोक गेहलोत म्हणाले.
तर दुसरीकडे “पक्षाला कुठेतरी एकट्याने किंवा युती करून राज्यवार रणनीती बनवावी लागेल. त्याचवेळी निकाल आपल्या बाजूने लागणार नाही हे आम्हाला माहीत होते, पण मेहनत केली आणि लढा दिला”, असे प्रियंका गांधी बैठकीत म्हणाल्या असल्याची माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त करा; आमदार नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भगवंत मान यांच्या ‘त्या’ निर्णयाचे पवारांनीही केले स्वागत; राज्य सरकारलाही केले अनुकरन करण्याचे आवाहन
किसींग सीन आणि शर्टलेस होताच प्रभासला फुटतो घाम; म्हणाला, “ते सीन करताना…”
अपक्ष लढले, तिकीटासाठी पक्षाला रामराम; पराभूत झाल्यावर उत्पल म्हणतात मला आमदार व्हायचच नव्हतं