कोरोनाच्या काळात लोकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. कोरोना काळात झालेले आर्थिक नुकसान अजूनही लोक उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच अनेकांचे दुचाकी घेण्याचे स्वप्न देखील मागे पडले. अशावेळी ग्राहक जुनी गाडी खरेदी करण्यास पसंदी देतात. दुचाकी सेकंड हँड स्कूटी घेणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे.
सध्या दुचाकी नवीन वाहनांची किंमत गगनाला पोहोचली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक नवीन वाहन खरेदी करण्याऐवजी काही वर्ष वापरलेल्या जुन्या गाडीला खरेदी करण्यासाठी आपली पसंती देतात. त्यामुळे अशा ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, बाजारात आता सेकंड हँड स्कूटी खूपच स्वस्तात उपलब्ध आहेत. होळीआधी हा गाड्यांचा सेल उपलब्ध झाला आहे.
Honda Activa आणि TVS Jupiter सारख्या लोकप्रिय स्कूटर्स तुम्ही आता फेसबुक मार्केटप्लेस वरून अगदी सहज खरेदी करु शकतात. यावर तुम्हाला 20 हजार रुपये प्राइस लिमिट सेट केल्यावर अनेक चांगले पर्याय दिसतील. यामध्ये होंडा अॅक्टिव्हाचे 2009 चे मॉडेल तुम्हाला केवळ 12,999 रुपयात उपलब्ध होईल.
जर तुम्ही फेसबुक मार्केटप्लेस वरती प्राइस लिमिट 30 हजार रुपये सेट केली तर तुम्हाला होंडा अॅक्टिव्हाचे 2013 चे मॉडेल 22,500 रुपयात उपलब्ध होईल. तसेच Activa चे 2015 चे मॉडेल 39, 500 रुपयात उपलब्ध होत असून, Activa 3G चे 2015 चे मॉडेल 36,900 रुपये किंमतीत मिळेल.
जर तुम्हाला TVS Jupiter चे जुने मॉडेल हवे असेल तर ते देखील अगदी स्वस्त किमती मध्ये या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. याठिकाणी तुम्ही, टीव्हीएस ज्यूपिटरचे 4 वेगवेगळे 2017 मॉडेल 35 ते 45 हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. या मॉडेल ची किंमत 23,999 पर्यंत आहे.
फेसबुक मार्केटप्लेस हा प्लॅटफॉर्म OLX सारखाच एक प्लॅटफॉर्म आहे. येथे तुम्ही तुमच्या नवीन-जुन्या वाहनांची खरेदी -विक्री करू शकतात. घरबसल्या गाडी खरेदी करण्यासाठी हे योग्य प्लॅटफॉर्म आहे. गाड्यांसोबत इतर वस्तूंची देखील याप्लॅटफॉर्मवरून खरेदी विक्री होत असते. पण या ठिकाणाहून गाड्या खरेदी करताना गाडीच्या मालका विषयी माहिती काढून घेणे आवश्यक असते. नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते.