राज्यात लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठा गोंधळ झाला दरम्यान, आता राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.
प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा (भादंवि कलम १२४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला आह़े. राणा दाम्पत्याला रविवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली़.
थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांना नडणाऱ्या राणा दाम्पत्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा करण्यात आला आहे. हा विरोधकांसाठी देखील इशारा असल्याच बोललं जातं आहे. अलीकडे वेगवेगळ्या मुद्यांवरून विरोधक थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट करताना दिसतं आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजप नेते नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना म्याँव म्याँव असा उल्लेख केला होता. त्यानंतर ठाकरेंनी चांगलाच नितेश राणे यांना दणका दिला होता. आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे नितेश राणे यांना अटक झाली होती.
राज्यात सध्या अटक पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरेंवर टीका केली की थेट जेलची हवा भोगावी लागणार, जणू असे समीकरणच झाले आहे. जे कुणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करतील, त्यांच्यावर थेट अटकेची कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा यातून दिला जात आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री ठाकरे राज यांच्यावर काय अॅक्शन घेतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे सध्या राजकीय वर्तुळात अनेक मुद्यांवरून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. यामुळे राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरेंची सभा रद्द करावी लागणार? औरंगाबादेत आजपासून 9 मेपर्यंत जमावबंदी; सरकारचा कठोर निर्णय
“…म्हणून माझा खून होत नाही”; गुणरत्न सदावर्ते यांचं खळबळजनक विधान
व्हिडीओत दिसणारी किरीट सोमय्यांची ‘ती’ जखम बनावट? पोलीसांनी उचललंल मोठं पाऊल
अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या, सदाभाऊ खोत यांची जहरी टीका