युक्रेनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान सर्वत्र सामूहिक स्मशानभूमी झाल्याचा दावा केला जात आहे. जिथे अनेक लोकांना एकत्र मारून त्यांना दफन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. प्रथम बुचा शहरात एक सामूहिक स्मशानभूमी सापडली आणि आता अशीच आणखी एक सामूहिक स्मशानभूमी राजधानी कीवपासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर सापडली आहे.( act that Russian soldiers are committing with Ukrainian women)
एवढचं नाही तर हे गाडलेले मृतदेह काढून पोस्टमार्टम केले जात असताना हृदयद्रावक वास्तव समोर येत आहे. ज्या महिलांचे मृतदेह कबरीतून बाहेर काढले जात आहेत, त्यांच्यावर प्रथम बलात्कार करण्यात आला आणि नंतर त्यांना पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळ्या घालण्यात आल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.
युक्रेनियन फॉरेन्सिक डॉक्टर ब्लादिसलेव पेरोव्स्की आणि त्यांची टीम कीव जवळ एका सामूहिक कबरीत सापडलेल्या मृतदेहांवर पोस्टमॉर्टेम करत आहेत. डॉ. ब्लादिसलेव यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना फॉरेन्सिक तपासणीत असे आढळून आले की, ज्या युक्रेनियन महिलांना ठार करून कबरीत पुरण्यात आले होते, त्यांच्यावर त्यापूर्वी बलात्कार झाला होता. डॉ. ब्लादिसलेव म्हणाले की, ते यापेक्षा जास्त माहिती देऊ शकत नाहीत कारण त्यांना आणि त्यांच्या टीमला अशा अनेक मृतदेहांची तपासणी करून डेटा तयार करायचा आहे.
डॉ. ब्लादिसलेव आणि त्यांची टीम बुचा, इरपिन आणि बोरोडियान्का या शहरांमधून सापडलेल्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करत आहेत. या ठिकाणी रशियन सैनिकांनी नरसंहार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर ब्लादिसलेव आणि त्यांची टीम दररोज 15 मृतदेहांची तपासणी करतात. यातील अनेक मृतदेह कुजले असून त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे.
एका वृत्तसंस्थेच्या वृतानुसार, डॉ. ब्लॅडिसलेव्ह यांनी सांगितले असे अनेक मृतदेह आहेत ज्यांची ओळख पटवणे अशक्य आहे. अनेकांचे चेहरे खराब झाले आहेत. त्यांच्या मृतदेहाचे अवशेष जोडावे लागतील. कधी कधी असा मृतदेहही सापडतो ज्याला डोके नसते.
महत्वाच्या बातम्या-
युक्रेननंतर फिनलॅंडवर रशिया करणार आक्रमण, या कारणामुळे संतापले पुतिन, पाठवले रशियन सैन्य
रशिया युक्रेन युद्ध: खरंच बुक्का येथे झाले होते का हत्याकांड? युद्धाच्या ४४ व्या दिवशी झाले खळबळजनक खुलासे
रशिया-युक्रेन युद्धात भारताने घेतलेला हा निर्णय ठरला गेमचेंजर, अचानक लागल्या नेत्यांच्या रांगा
पतीला गोळी मारली, मुलांसमोर रशियन सैनिकांनी महिलेवर केला बलात्कार, युक्रेनच्या नेत्याने सांगितला भयानक किस्सा