तर आता राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ‘राज्यसभा निवडणुकीत मोठी दगाबाजी झाली आहे. शब्द देऊन ही दगाबाजी करण्यात आली आहे. त्यांची यादी आमच्याकडे आहे,’ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. अशातच आता महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी या निकालावर सविस्तर भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीतील पक्षांवर खापर फोडले आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना कडू म्हणाले, ‘शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने आपापल्या उमेदवारांना जास्तीची मते टाकून सुरक्षित करण्याच्या नादात ठाकरे सरकारचा गेम बिघडवला त्यामुळे हा पराभव झाला,’ असं कडू यांनी स्पष्टच सांगितलं.
यामुळे सरसकट अपक्षांना बदनाम करून चालणार नाही, असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितलं आहे. पुढे बोलताना बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ‘पक्षांनी रिस्क घेतली असता तर आज चित्र वेगळे असले असते. विधान परिषदेत हे चित्र बदलू शकते,’ असं देखील कडू म्हणाले.
याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी काल राज्यसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच कौतुक केलं. यावर बोलताना कडू म्हणाले, ‘फडणवीसांच्या केलेल्या कौतुकामध्ये पवारांचा एक वेगळा डाव असू शकतो, एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल मात्र शरद पवारांच्या मनात काय आहे, हे सांगता येणार नाही.’
दरम्यान, इतर पक्षांनी रिस्क घेतली त्यामुळे निकाल त्यांच्या बाजूने लागला. ज्या आमदाराचं सभासदत्व कायम आहे. पण त्यांना मतदान अधिकार नाही, हा कोर्टाचा निकाल अनाकलनीय असल्याचे देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. समुद्राची खोली मोजता येईल मात्र शरद पवारांच्या मनात काय आहे, हे मोजता येत नाही असेही यावेळी ते म्हणाले.