बुधवारी (20 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी इस्लामपूरमध्ये होते. इस्लामपूर येथील कार्यक्रमात मिटकरी यांनी ब्राह्मण व पुरोहितांबाबत भाषणात अपमानास्पद उल्लेख केला. मिटकरी यांच्या याच वक्तव्यावरून राजकीय वातावरण पेटलं आहे.
याच मुद्यावरुन मिटकरी यांच्या वक्तव्याविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला आहे. ब्राह्मण समाजाविषयी तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करुन ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मिटकरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी ब्राह्मण सेवा संघाने केली.
तर दुसरीकडे मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा नाशिकमधील पुरोहित संघ व साधू महंतांनी जाहीर निषेध नोंदवत मिटकरी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अशातच आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.
याबाबत ट्विट करत आचार्य भोसले यांनी मंत्री जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे आणि अमोल मिटकरी यांच्यावर नाव न घेता जहरी टीका केली आहे. ‘हिंदू धर्माची चेष्टा करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून राज्याच्या राजकारणातील शकुनी मामाचा सरदार अमोल किटकरी आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
पुढे आचार्य भोसले म्हणतात, ‘मिटकरी यांच्या वक्तव्यावर निर्लज्जपणे दात काढणारे मंत्री जयंत पाटील आणि तीन-चार बायका सोडणारे मंत्री धनंजय मुंडे आहेत, अशा जहरी शब्दात त्यांनी थेट पाटील आणि मुंडे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. त्यामुळे आता आणखीनच राजकारण तापणार यात काही शंका नाही.
दरम्यान, ‘पावसाळी सुरु होण्याआधी या बांडगुळांनी तोंड वर काढंल आहे. परंतु हिंदू समाज यांना आणि शकुनी मामाच्या फौजेला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच आचार्य भोसले यांनी यांनी ठाकरे सरकारमधील नेत्यांना दिला आहे. सध्या मिटकरी हे त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरेंना सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील; सेनेच्या वाघाची जहरी टीका
अवघ्या १०० रुपयांत जोडप्याने खरेदी केलं घर; खोलीतून बाहेर पडताच समोरील दृश्य पाहून बसला मोठा धक्का
सात पराभवानंतरही मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीत का आहे? जाणून घ्या फॉरमॅटच नवं गणित
४५ वर्षांच्या वयातही हॉट दिसते ‘आओ राजा’ गाण्यातील चित्रांगदा, सुंदर दिसण्यासाठी पिते ‘हे’ खास ड्रिंक