Share

साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपी मौहन चौहानला फाशीच, एक वर्षाच्या आतच लावला निकाल

साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणतील प्रमुख आरोपी मोहन चौहान यास आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणाचा जलद गतीने तपास करत केवळ एका वर्षाच्या याचा निकाल लावण्यात आला आहे.

हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत राज्य सरकारच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मुंबईतील या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता.  बलात्कारानंतर महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता.

त्यांनंतर, साकीनाका परिसरात झालेल्या या संतापजनक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करत आरोपपत्र दाखल केलं होतं. या घटनेत एकच आरोपी आहे. पोलिसांनी ७७ साक्षीदारांचे जबाब नोंद करुन ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केलं होतं.

मोहन चौहान हा ड्रायव्हरचं काम करायचा. आता त्याचं वय ४५ आहे. बुधवारी त्याच्याविरोधात जेव्हा शिक्षेची मागणी करण्यात आली, तेव्हा मोहन कोर्टरुममध्येच आरडाओरडा करु लागला, रडू लागला, अखेर संतापलेल्या न्यायाधीशांनी आरोपीला बाहेर जाण्यास सांगितलं.

तरीही आरोपीने कोर्टात बेशिस्त वागणूक केली. आरोपीची कोर्टरुममधील बेशिस्त वागणूक पाहून पब्लिक प्रॉसिक्यूटर महेश तुले यांनी या आरोपीत सुधार होण्याची कोणतीही शक्यता नाही, असे म्हटले. या प्रकरणाचा एका वर्षाच्या आत निकाल लावण्यात आला आहे.

घडलेले प्रकरण म्हणजे, पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती. गुन्हा घडला त्याच्या २५ दिवस आधीही आरोपीनं महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमानं महिलेवर बलात्कार केला होता. त्यानंतर या महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हत्यार टाकून तिचा खून केला होता.

पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीनं चालविण्यात येईल, असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यानी जनतेला दिलं होतं. त्यानुसार मुंबई पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करत आपलं आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केलं होतं.

क्राईम इतर

Join WhatsApp

Join Now