गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटाच्या दरीत एका २८ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. या तरूणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिस या घटनेचा तपास अगदी बारकाईने करत असताना देखील त्यांच्या हाती काही पुरावे लागत नव्हते. शेवटी खुनी किती हुशार असला तरी तो जास्त दिवस लपू शकत नाही हेच खरे ठरले आहे.
कारण की, अवघ्या काही तासात या प्रकरणातील आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. जुन्या भांडणाच्या वादातून मित्रांनीच या २८ वर्षीय तरूणाची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना जेलबंद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी या दोन आरोपींनी डाव रचला होता. त्यांनी दारु पिण्याचा बहाणा करत या २८ वर्षीय तरुणाला खेड घाटात बोलावून घेतले होते. यावेळी त्यांनी दारूच्या नशेत तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच त्याला दरीत ढकलून दिले. हे सर्व कृत्य करुन दोन्ही आरोपी तेथून फरार झाले.
परंतु आरोपी जास्त वेळ पोलिसांपासून लपू शकले नाही. पोलिसांनी आपल्या तपासून काही तासातच आरोपींना शोधून काढले. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव स्वप्नील सखाराम चौधरी असे होते. दरम्यान, खेड घाटात एका तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली.
तरुणाच्या डोक्यात धारदार कोयत्याने वार करुन मृतदेह खोल दरीत टाकण्यात आला होता. पोलिसांनी ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेतला आणि आपला तपास सुरु केला. यानंतर काही तासातच पोलिस आरोपींपर्यंत पोहचले. या दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
परंतु सध्या पोलिसांनी आरोपींबाबत आणखीन माहीती उघडकीस आणलेली नाही. या घटनेमुळे स्वप्नीलच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. मुख्य म्हणजे कुटुंबीयांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
शिवसेनेला मोठा धक्का! आयकर विभागाच्या रडारवर ‘हा’ बडा नेता, IT विभागाने घरी मारली धाड
ना बायको ना मुलगा, मग सलमानच्या २३०० कोटींच्या संपतीचं काय होणार? सलमानने केला खुलासा
‘या’ अभिनेत्रीच्या हाती लागला अक्षय कुमार आणि इमरान हाशमीचा १०० कोटी बजेटवाला चित्रपट
आम्हाला आता भारताकडूनच अपेक्षा, युद्ध थांबवण्यासाठी मोदींनी पुढाकार घ्यावा; युक्रेनची विनवणी