Share

रोहितच्या मते ‘हा’ खेळाडू आहे सगळ्यात खतरनाक, म्हणाला, ‘४० मिनीटात मॅचचा नक्शा बदलून टाकतो’

भारतीय क्रिकेट संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन करत श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली. अवघ्या तीन दिवसांत दोन्ही सामने जिंकून भारताने श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला. या मालिकेदरम्यान, भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतने (Rishabh Pant) धमाकेदार फलंदाजी केली आणि त्याला ‘प्लेयर आफ द सीरीज’ म्हणून गौरवण्यात आले.(according-to-rohit-this-player-is-the-most-dangerous)

पहिल्या सामन्यात त्याने 96 धावा केल्या तर दुसऱ्या सामन्यात त्याने सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला. ऋषभ पंतला ‘प्लेयर आफ द सीरीज’ गौरवण्याबद्दल रोहित म्हणाला की, तो कसा फलंदाजी करतो हे आपल्याला माहित आहे आणि एक संघ म्हणून आम्ही त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्याचे स्वातंत्र्य देऊ इच्छितो, परंतु त्याला सांगण्यात आले आहे की मॅचची स्थिती आणि पिचवर देखील लक्ष्य ठेव.

मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पंतने श्रीलंकेविरुद्ध 97 चेंडूत 96 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. त्याचवेळी बंगळुरूमध्ये त्याने अवघ्या 31 चेंडूत 50 धावांची खेळी खेळून विक्रम केला. 28 चेंडूत कसोटीत अर्धशतक पूर्ण केले आणि भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये असे करणारा सर्वात वेगवान फलंदाज ठरला.

Rishabh Pant

रोहित म्हणाला की, कधीकधी असं होतं की, त्याने असा शॉट का खेळला, अस सारख डोक्यात चालू असत, पण तो ज्या पद्धतीने खेळतो, ती पद्धत आम्हाला स्वीकारावा लागेल. तो असा खेळाडू आहे जो अर्ध्या तासात किंवा 40 मिनिटांत सामन्याचे रूप बदलू शकतो. त्याचे यष्टिरक्षणही उत्कृष्ट असून प्रत्येक सामन्यात त्याच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. त्याचे डीआरएसचे निर्णयही योग्य ठरत आहेत.

आयपीएल 2022 सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. आयपीएल 2022 साठी दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला कायम ठेवले आहे. यासोबतच कर्णधारपदाची जबाबदारीही ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंत फलंदाजीसोबतच कर्णधारपदावर कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे.

महत्वाच्या बातम्या-
द काश्मीर फाईल्स चा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ; आत्तापर्यंत केली एवढ्या कोटींची कमाई
कश्मीरी पंडीतांच्या हत्याकांडावेळी भाजपचे ८५ खासदार काय करत होते? त्यांच्या पाठींब्यावर सरकार होते
बुम बुम बुमराहने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकले अनोखे त्रिशतक
तू बोल्ड फोटोशूट का करत नाहीस? चाहत्याच्या प्रश्नावर विद्या बालनने दिले असे उत्तर

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now