बुधवारी मध्यरात्री सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील नामवंत मल्ल सिध्दाराम विश्वनाथ साखरे यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. सोलापूर-हैदराबाद महामार्गावर दोड्डी येथे जीप आणि ट्रकच्या अपघातात साखरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सोलापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
एकेकाळी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुसक्या आवळण्यामध्ये साखरे सर्वांत पुढे होते. त्यांनी अनेक मोठ मोठ्या गुंडांना सुतासारखे सरळ केले होते. त्यांच्या कामगिरीचे किस्से संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द होते. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
सांगण्यात येते की, साखरे कुस्तीमधील ऑल इंडिया चॅम्पियन होते. १९८० सालात सोलापुरात बाला रफीक शेख यांच्यासोबत झालेल्या कुस्तीत साखरे विजेते ठरले होते. विशेष म्हणजे ते, पंजाबचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक कर्तारसिंग यांचे सर्वांत आवडते पठ्ठे होते. साखरे पोलीस दलात ३४ वर्षांची सेवा करून सहाय्यक फौजदार पदावरून निवृत्त झाले होते.
आपल्या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येई. आता साखरे यांच्या निधनामुळे पोलीस विभागात एक पोकळी निर्माण झाली आहे. साखरे यांच्या अपघाती मृत्यूनंतर पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान सिध्दाराम साखरे यांचा एक मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे.
तसेच मल्लिनाथ साखरे, चिदानंद साखरे असे त्यांना दोन भाऊ आहेत. मल्लिनाथ साखरे सुध्दा गेल्या काही दिवसांपूर्वीच पुणे पोलीस दलातून सहाय्यक फौजदार पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. तर चिदानंद साखरे हे सध्या सोलापूर पोलीस आयुक्तालय हवालदार पदावर कार्यरत आहेत. हे तिन्ही भाऊ गावासाठी एक आदर्श बनले आहेत.
महत्वाच्या बातम्या
आधी अस्वस्थ वाटलं मग उलट्यांचा भयंकर त्रास; सुप्रसिद्ध अभिनेत्याचं दुःखद निधन, सिनेसृष्टीला मोठा धक्का
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर अश्लील पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिकांनी धू-धू धुतले; व्हिडिओ व्हायरल
‘शूटिंगला बोलावून किडनी विकतील’, ‘झुंड’ फेम बाबूचा किस्सा ऐकून थांबणार नाही हसू
स्वरा भास्करसोबत कॅब चालकाचं विचित्र कृत्य, अभिनेत्रीनं ट्विट करत सांगितला धक्कादायक घटनाक्रम