acb action vaibhav naik who suppport uddhav thackeray | राज्यात सध्या शिंदे-फडणवीसर सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर हे सरकार स्थापन झाले होते. एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. पण काही अजूनही ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे असल्याचे दिसून येत आहे.
आमदारांपाठोपाठ १२ खासदारही शिंदे गटात सामील झाले होते. पण १५ आमदार अजूनही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. त्यामध्ये कणकवलीचे वैभव नाईकांचा देखील समावेश आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी एसीबीकडून शुक्रवारी चौकशी करण्यात आली आहे.
सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही कारवाई सुरु आहे. त्यानंतर आता वैभव नाईकांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाकरे गटात असणाऱ्या निष्ठावंतांवर कारवाई, चौकशी केली जात असल्याचे दिसून येत आहे. वैभव नाईकांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे संपुर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
वैभव नाईक हे कुडाळ मालवण मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. सत्तांतराच्या काळात ते ठामपणे उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊन उभे राहिले होते. त्यांची रत्नागिरीच्या एसीबी पथकाकडून कणकवलीच्या शासकीय विश्रामगृहावर चौकशी करण्यात आली आहे.
वैभव नाईक यांच्या चौकशीबाबतचा तपशील अजून एसीबीकडून देण्यात आलेला नाही. पण यावर आता वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिला आहे. अशा कितीही चौकशीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत, असे वैभव नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंच्यावर यांच्यासोबत राहणाऱ्यांवर दबाव आणल्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी खर्चाचे विवरण पत्र सादर करण्याचे लेखी पत्र दिले आहे. आपण आजवर कोणताही घोटाळा केला नाही. त्यामुळे एसीबीने मागितलेली माहिती आपण लवकरच सादर करु असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
narindar kaur : बाबो! २८ वर्षीय महिला आमदाराने थेट कार्यकर्त्याशीच थाटला संसार, देशभरात रंगलीये चर्चा
nashik : नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव! बसला आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घटनास्थळी जाणार
Uddhav Thackeray : स्मिता-जयदेव ठाकरेंनी बाळासाहेबांना नेहमी मनस्तापच दिला आणि आता त्यांनाच तुम्ही…आत्तेबहीणीचा शिंदेंवर गंभीर आरोप