Share

अबू आझमींचा राज ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, ‘भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा..’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद सभेत मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. राज यांनी मांडलेल्या भूमिकेवर समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत मशिदींवरील भोंग्यासंदर्भात आपली भूमिका मांडली. म्हणाले, 4 तारखेपासून मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर भोंगे लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसाचं पठण केलं जाईल.

तसेच त्यांनी यावेळी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवारांवर हल्लाबोल केला. यामुळे अबू आझमींचा संताप झाला. त्यांनी याच टीकेचा धागा पकडत राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज यांच्यावर केलेल्या टीकेमुळे सध्या त्यांच्या वक्तव्यांची चर्चा होत आहे.

अबू आझमी म्हणाले, शरद पवार यांच्या पायाखालच्या वाळूइतकी पण राज ठाकरेंची लायकी नाही. शरद पवार हे फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचे एक ज्येष्ठ नेता आहेत. ते बडे नेते आहेत. त्यांना मी सांगेन की, अशा भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा.

तसेच राज ठाकरेंवर निशाणा साधत म्हणाले, हे संविधानच्या विरोधात बोलतात. मशिदींवरील भोंग्यांना संविधानाने परवानगी दिली आहे, सु्प्रीम कोर्टाने मशिदींवर लाऊड स्पिकर लावण्यासाठी परवानगी दिली आहे तर हे आहेत तरी कोण अशाप्रकारची भाषा करणारे? असा सवाल अबू आझमी यांनी केला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रचंड टीका केली. शरद पवारांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून जाती-पातीचं राजकारण सुरु केल्याची टीका राज ठाकरेंनी केली भाषणात केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया येत आहेत.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now