‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींपासून अनेकांनी त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी चित्रपटाचे स्वागत केले आहे, तर काहींनी अर्धवट सत्य दाखवले म्ह्णून टीका केली. असे असताना आता अभिनेते अभिषेक बच्चन याने देखील चित्रपटाबद्दल आपले मौन सोडले आहे.
अनेक सेलिब्रिटी सध्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर प्रतिक्रिया देण्यास धजावत आहेत. चित्रपटावरून राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशी परिस्थिती असताना अनेक सेलिब्रिटींनी यावर आपले मौन धारण केले आहे.
नुकतेच ‘दसवी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिषेक बच्चन याची एका वृत्तवाहिनीला मुलाखत होती. त्यावेळी चित्रपट आणि राजकारणावरील प्रश्नावर तो म्हणाला, ‘तुम्ही काश्मीर फाईल्सबद्दल बोलत आहात, नाही का? दोन-तीन दिवस आम्ही यावर चर्चा करत आहोत.
तुम्हाला सांगू इच्छितो की, काहीही बोला, तुम्हांला त्याचे राजकारण करायचे आहे. त्याला जातीयवादी बनवायचे आहे. हे तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण, जर चित्रपट चांगला नसता तर बॉक्स ऑफिसवर एवढी चांगली कामगिरी कशी झाली असती? असा प्रश्न करत चित्रपटावर आरोप करणाऱ्यांना त्याने सवाल केला.
तसेच म्हणाला, ‘चित्रपट चांगला आहे, त्यामुळे तो चांगला चालत आहे. याशिवाय त्याच्या यशामागे कोणतेही कारण नाही. तरीही त्यातून तुम्ही अनेक अर्थ काढू शकता. पण, चित्रपट चांगला असेल तर चालेल, असे त्याच्या कमाईतून आणि लोकांनी दिलेल्या प्रतिसादातून दिसत आहे.
यासोबतच त्याने सांगितले की हा त्याचा वैयक्तिक दृष्टिकोन नाही. कारण, आतापर्यंत मी या चित्रपटाचे कौतूक न केलेल्या व्यक्तींना भेटलेलो नाही. पुढे असाही म्हणतो की, मी चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे मी याबद्दल अधिक बोलू शकत नाही. पण,चित्रपट चांगला नाही हे सांगणारा अजून कोणी भेटला नाही, असे तो म्हणतो.