कोणताही कार्यक्रम असो वा पुरस्कार सोहळा अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत त्यांची मुलगी आराध्या हजेरी लावत असते. नुकताच आयफा पुरस्कार सोहळा पार पडला या सोहळ्याला या तिघांनी हजेरी लावली होती. यावेळी, तिघांनी केलेल्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या पुरस्कार सोहळ्यातील अभिषेकच्या धमाकेदार डान्सने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या सोबत पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांनी देखील ताल पकडला. त्यांच्या नृत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिषेक त्याच्या ‘दसवी’ चित्रपटामधील ‘मचा मचा’ गाण्यावर नाचत आहे. डान्स करत असताना, तो स्टेजच्या खाली उतरतो, आणि समोर बसलेल्या आपली बायको ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांच्यासोबत हावभाव करत डान्स करतो.
अभिषेकला डान्स करताना पाहून ऐश्वर्या देखील त्याला साद देते आणि बसल्या जागीच तीही हावभाव देत डान्स करते. बच्चन परिवाराला नाचताना बघून सर्वांची नजर या तिघांकडे होती. ऐश्वर्या आणि आराध्या अभिषेकला साथ देत त्यांच्या जागेवरून नाचत आहेत, हे पाहून चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नाचता नाचता अभिषेक आराध्याला ‘फ्लाईंग किस’ देतो. जोरदार हावभाव देत अभिषेकने केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडीओचे सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतूक होत आहे.
बच्चन कुटूंबाकडे चाहते सर्वाधिक प्रतिष्ठित घराणे म्हणून पाहतात. त्यामुळे कुटुंबाविषयी छोट्यातील छोटी घटना जरी असली तरी ती सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काही सेकेंद सुद्धा पुरेसे असतात. सध्या अभिषेक बच्चन याने मुलीसोबत आणि ऐश्वर्यासोबत केलेल्या डान्सला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.