‘…तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता’

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे नेहमी आपल्या आक्रमक व्यक्तव्याने चर्चेत असतात. हे सांगण्याच कारण म्हणजे पुन्हा एकदा बिचुकले यांनी एक मोठं व्यक्तव्य केलं आहे. काल हाती आलेल्या विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आला आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी अचानक बंड पुकारल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेत उभी फूट पडली असून शिंदेंसह जवळपास शिवसेनेचे २५ आमदार गुजरातच्या सुरतमध्ये रातोरात दाखल झाल्याने महाराष्ट्रात मोठा भूकंप झाला आहे.

याचाच धागा पकडत बिचुकले यांनी मोठं विधान केलं आहे. ‘सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शिंदे राजकारण करत आहेत. माझा शिवसेनेसोबत संबंध नाही. पण आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता, असं रोखठोक विधान बिचुकले यांनी केलं आहे.

ते अळंदीत याबद्दल माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना बिचुकले यांनी म्हंटलं आहे की, ‘शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर मोठे झाले आहेत यामध्ये काही दुमत नाही, अस देखील ते म्हणाले. दरम्यान, आज बिचुकले यांनी आळंदीत माऊलींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राजकीय विषयावर देखील भाष्य केलं.

दरम्यान, तर दुसरीकडे अशातच एकनाथ शिंदे यांनी एक सूचक ट्विट केले आहे. बंडखोरीनंतर त्यांचे पहिले ट्विट आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, तसेच बाळासाहेबांनीच आपल्याला हिंदुत्वाची शिकवण दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
चुकीला माफी नाही! एकनाथ शिंदेंना पहिला ‘ठाकरी’ झटका ! शिवसेनेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसमोर ठेवली ‘ही’ मोठी अट; म्हणाले, चर्चा करणार पण त्यासाठी…
कोण आहेत सी. आर. पाटील ज्यांनी एकनाथ शिंदेंना रातोरात सुरतला हलवलं? वाचा त्यांच्याबद्दल..