(Abhijit Bichukle): अभिजित बिचुकले हा एक भारतीय राजकारणी, कवी आणि मराठी टेलिव्हिजनचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. तो ‘बिग बॉस मराठी सीझन 2′ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. तेव्हापासून तो जास्तच चर्चेत आला. अभिजीत बिचुकले कलर्स मराठीचा लोकप्रिय शो बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये सामील झाला आणि राजकारणातील त्याच्या कारकिर्दीला फायदा झाला.
जेव्हा त्याला बिग बॉसमध्ये शोच्या निर्मात्यांनी सामील केले तेव्हा सुरुवातीला तो या शोमध्ये सहभागी होण्यास संकोच करत होता. परंतु, नंतर तो सहभागी झाला. तो बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये स्पर्धक म्हणून सामील झाला खरा, पण त्याच्या एका वादामुळे त्याला शोमधून बाहेर पडावे लागले. अभिजीत बिचुकले हे नाव सगळ्यांच्या परिचयाचे आहे.
बिचुकले नाव जरी कानावर पडलं तर सगळ्यात पहिला डोक्यात विचार येतो तो म्हणजे अफाट मनोरंजन. मराठीच नव्हे तर तो हिंदी ‘बिग बॉस’ मध्येही सहभागी झाला होता. तो स्वतःला मुख्यमंत्री, भावी पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदाचा दावेदार समजतो. झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात त्याची पत्नी अभिज्ञा भावे त्याच्यासह उपस्थित होती. त्यांनी यावेळी अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या.
याचबरोबर त्यांनी एकदा पत्नीकडून मार खाल्ल्याचेही कबुल केले. त्यांच्या या किस्स्याने उपस्थितांना हसू आवरलं नाही. अभिजीत म्हणाला, “आम्ही दोघे कधीही भांडणं करत नाहीत. एक माझी मैत्रिण होती. ती माझ्या पत्नीला म्हणाली की, हा माणूस खूप चांगला माणूस आहे. मी यांच्या जीवनात येते. माझा पगार मी तुम्हाला देते. हे ऐकून माझ्या पत्नीने मला मार मार मारलं.”
अभिजीतचा हा किस्सा ऐकून अभिनेता कुशल बद्रिके त्याला विचारतो, “ती मुलगी अजूनही तुमच्या संपर्कात आहे का? मला पैशांची अधिक गरज होती.” कुशलने हा जोक केल्यांनतर सगळे जोरजोरात हसू लागतात. अभिजीत यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात व्हायरल होत आहे. अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेते प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतात.
त्यामुळेच त्यांना सर्वत्र प्रसिद्धी मिळते. दुसऱ्याला हसवण्याची कला असणारे कलाकार सर्वात जास्त प्रसिद्ध असतात. हसणे आरोग्यासाठी चांगले असते. तेच आरोग्य देण्याचे काम या अनेक शो मधून केले जाते.
महत्वाच्या बातम्या
coffee With Karan: कियाराला शाहिद कपूरच्या कानाखाली मारायची होती पण.., कॉफी विथ करणमध्ये मोठा खुलासा
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भर विधानसभेत जाहीर सवाल, म्हणाले, ‘आम्ही गद्दार असतो तर…
ED : आतापर्यंत अनेकांना नोटीस देणाऱ्या ईडीलाच कोर्टाची नोटीस; वाचा काय आहे प्रकरण
सत्ताधारी असून पायरीवर बसवलय वाघाने, ३२ वर्षांच्या पोराने तुम्हाला घोडे लावलेत





