Share

दसरा मेळावा वादात अभिजित बिचुकलेंची एंट्री; म्हणाले कुणाच्याच मेळाव्याला जाऊ नका, कारण….

काही दिवसांत मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडणार आहे. राज्यात सध्या या दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात घमसान सुरू आहे. नेमका मेळावा कोणाचा असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यातच आता बिग बॉसचे फेमस स्पर्धक अभिजित बिचुकले यांनी या वादात उडी घेतली आहे.

अभिजित बिचुकले यांनी दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. सातत्याने वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत असलेले बिचकुले यांनी जनतेला सभा ऐकायलाच जाऊ नका असा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

एवढेच नाही तर बिचुकले म्हणाले, दसऱ्याचं कुणाला काही घेणं- देणं नाही. सध्या सुरू असलेलं राजकारण कोणाच्या हिताचं नाही. कोण मोठा यावरून हे राजकारण सुरू आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोप हे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आहेत. त्यामुळे जनतेने आपलाच विचार करावा असेही म्हटले आहे.

दसरा मेळाव्याचा नेमका वाद काय तर, शिवतीर्थावर दसरा मेळावा ही शिवसेना पक्षाची गेल्या ५६ वर्षांची परंपरा आहे. दसऱ्या दिवशी या मैदानावरुन शिवसैनिकांना संबोधित केले जाते. पण यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटानेही महापालिकेकडे अर्ज केला आहे.

आपलीच खरी शिवसेना या हेतूने शिंदे गटाने हा अर्ज केला आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी दसरा मेळावा कुठे घेणार यावरुन सूचक वक्तव्य केलेली आहेत. आता शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा होणार हे जरी स्पष्ट नसले तरी बिचकुले यांनी दिलेला सल्ला जनतेच्या पचनी पडणार का हे येणाऱ्या दिवसांत कळेलच.

बिचुकले यांच्याबद्दल माहिती म्हणजे, अभिजीत बिचुकले हे कवी मनाचे नेते आहेत. शिवाय राज्यातील घडामोडीवर त्यांची सातत्याने वक्तव्य समोर येत असतात. राजकारणातील अनेक घडामोडींवर ते आपलं मत व्यक्त करून, सर्वांचे लक्ष वेधून घेतात. त्यांचं देशाचा पंतप्रधान होण्याचं देखील स्वप्न आहे.

राजकारण इतर मनोरंजन

Join WhatsApp

Join Now