छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मैहुल पै (Abhidnya Bhave Husband) सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. रूग्णालयातच त्याच्यावर सध्या उपचार सुरु असून यासंदर्भात नुकतीच मेहुलने एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच त्याने रूग्णालयातील काही फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
मेहुलने कॅन्सरसंबंधित माहिती देताना इन्स्टाग्राम हँडलवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच त्याने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिज्ञा आणि मेहुल रूग्णालयात असल्याचे दिसून येत आहे. तसेच दुसऱ्या फोटोत अभिज्ञा मेहुलच्या डोक्याचं चुंबन घेताना दिसून येत आहे.
फोटो शेअर करत मेहुलने लिहिले की, मला माझ्या आयुष्यात अनेक मुर्ख लोक भेटले आहेत. पण कर्करोग हा त्यापैकी सर्वात मोठा आहे. मला माफ कर C तू चुकीच्या व्यक्तीला निवडलं आहेस. मेहुलच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी कमेंट करत तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.
अभिज्ञाने २०१४ साली वरुण वैटीकरसोबत विवाह केला होता. मात्र, काही कारणांमुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिज्ञा मागील वर्षी मेहुल पैसोबत दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकली. अभिज्ञा आणि मेहुल १५ वर्षापासून एकमेकांना ओळखायचे. दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते.
कॉलेजनंतर त्यांचे संपर्क तुटले. पण काही दिवसांनी ते पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. यादरम्यान त्यांची मैत्री घट्ट होत गेली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर मागील वर्षी ७ जानेवारी २०२१ रोजी ते विवाहबंधनात अडकले. पण लग्नाच्या वर्षभरातच त्यांच्यावर हे संकट कोसळलं आहे.
अभिज्ञाने ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ या मालिकांमधून घराघरात पोहोचली आहे. तर लगोरी’,‘कट्टी-बट्टी’ या मालिकेद्वारेही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली. मालिकांसोबत अभिज्ञाने वेब सीरिजमध्येही काम केली आहे. तिच्या ‘मूव्हिंग आऊट’ या वेब सीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्याचा दुसरा सीझनदेखील प्रदर्शित करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
कार चालवायला शिकत असताना ‘कच्चा बदाम’च्या गायकाचा भीषण अपघात, छातीला गंभीर दुखापत, प्रकृती चिंताजनक
‘पुष्पा’ स्टाईल दारूच्या तस्करीचा प्रयत्न फसला, टँकर पाहून पोलिसही झाले अवाक
“तिसऱ्या मुलासाठी पत्नीकडे रोज ऍप्लिकेशन देतो”, पतीच्या या उत्तरावर लाजली भाग्यश्री, पहा व्हिडीओ