टीईटी घोटाळ्यात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलीचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याच प्रकरणासंदर्भात एक नवी माहिती आता समोर येत आहे. २०१७ पासून वेतन सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Abdul Sattar’s daughter is getting government salary since 2017)
स्वतः अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या मुली टीईटी परीक्षेला पात्र नसल्याचा खुलासा केला होता. जर अब्दुल सत्तार यांनी त्या पात्र नसल्याचा खुलासा केला आहे. तर त्यांच्या मुलीला २०१७ पासून शिक्षक वेतन कसे काय चालू आहे? हा प्रश्न उपस्थित केला जातोय.
अब्दुल सत्तार यांची मुलगी हिना कौसर अब्दुल सत्तार शेख यांना शिक्षण विभागाकडून २०१७ पासून ते आजतागायत ४० हजारांहून अधिक वेतन चालू आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी अपात्र असल्याचा जो दावा केला आहे. त्या दाव्यावर सुद्धा शंका उपस्थित होत आहे.
शिक्षण विभागाने दाखवलेल्या रेकॉर्डनुसार हिना कौसर यांनी २०१७ पासून जुलै २०२२ पर्यंत वेतन घेतले आहे. त्यामुळे जर अब्दुल सत्तार यांच्या दाव्यानुसार त्या टीईटी परीक्षेस अपात्र असतील तर हे वेतन कोणत्या निकषांवर दिले जातेय? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
शिक्षण विभागाने मात्र हिना कौसर या सर्व निकषांना पात्र असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळेच त्यांना वेतन दिले जाते आहे. नोकरीत रुजू होण्याआधी शाळेकडून सर्व बाबी तपासल्या जातात, असे शिक्षण विभागाने म्हंटले आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून पात्रता निकष पडताळणी केली जाते. त्यानुसार आमच्या कार्यालयातून पगार पत्रक निघतात, अशा प्रकारची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
अंगात त्राण नसताना, ताप असताना आदित्य ठाकरे शिवसैनिकांसमोर गरजले; म्हणाले…
बिहारमधील भाजप-जेडीयूचे सरकार कोसळले; नितीशकुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतण्याला जुगार खेळताना अटक; क्राईम ब्रांचची कारवाई