sandipan bhumare : शिंदे गटाने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील नेते देखील आपापल्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.
सध्या शिंदे गटातील नेते मंडळी चांगलेच चर्चेत आले आहेत. ‘हिंदू गर्व गर्जना यात्रे’च्या कार्यक्रमात कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी नमाज पठण करायला जायचं असल्याचं सांगत मंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमातील सत्कार थांबवले. यामुळे काहीवेळ मंचावर नाराजीनाट्य पहायलं मिळालं.
शक्तीप्रदर्शनाद्वारे एकजूट दाखवावी असा हिंदू गर्व गर्जना यात्रेचा उद्देश असल्याचं बोललं जातं आहे. मात्र याच यात्रेच्या कार्यक्रमादरम्यान नाराजीनाट्य पाहायला मिळालं. काल औरंगादमधील संत एकनाथ रंगमदिर येथे हिंदू गर्व गर्जना मेळाव्याचं आयोजन केलं गेलं होतं.
मात्र नियोजित वेळ उलटून गेल्यानंतरही कार्यक्रम सुरु झाला नाही. त्यात सत्कार समारंभाने कार्यक्रमाला आणखीनच उशीर झाला. त्यामुळे सत्तार चांगलेच भडकले. सत्तारांनी नमाज पठण करायला जायचं असल्याचं सांगून थेट मंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमातील सत्कार थांबवले.
दरम्यान, आधी कार्यक्रम आवरुन घ्या, नंतर सत्कार करा, असं त्यांनी आयोजकांना स्पष्ट सांगितलं. मात्र आयोजक ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांनी माईकचा ताबा घेत प्रास्ताविक सुरु करा, असे आदेश दिले. यामुळे काहीकाळ मंचावर नाराजी नाट्य पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या
Buldhana: महाराष्ट्रात जंगलराज! मुल चोरीच्या संशयावरून तृतीयपंथीला बेदम मारहाण
Sangli: सांगलीत पालघरची पुनरावृत्ती! चार साधूंना बेदम मारहाण, धक्कादायक कारण आले समोर
सदावर्तेंना सुट्टी नाहीच! जामीन मिळताच सातारा पोलीस करणार उचलबांगडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
bjp : बारामतीत पवारांचा करेक्ट कार्यक्रम! भाजपने राष्ट्रवादीचा मोहराच फोडला, आक्रमक महिला नेत्याने हाती घेतलं कमळ