Share

नवनीत राणा-मुख्यमंत्र्यांच्या वादात अब्दुल सत्तारांची उडी; राणांना ओपन चॅलेंज देत म्हणाले…

abdul sttar

‘उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे,’ असे खुलं आव्हान खासदार नवनीत राणा यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आहे. यामुळे राणा विरुद्ध शिवसेना यांच्यातील वाद आणखीच वाढणार असल्याच बोललं जातं आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हटल्याप्रकरणी राणा दाम्पत्याची तब्बल 12 दिवसांनी तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

यावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. आता राणा विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वादात महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी उडी घेतली आहे. सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिलं आहे.

याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना सत्तार म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असं अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना सत्तार म्हणाले, “राणा चार आणेसारखी गोष्ट करत आहेत. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी केलं. लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशात उद्धव ठाकरेंच नाव आहे. काही लोकांना काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात.’

दरम्यान, “राणा दाम्पत्य भाजपाची सुपारी घेऊन बोलत आहेत. त्याचं उत्तर आम्ही निश्चित देऊ,” असं म्हणत सत्तार यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. सध्या राज्यात राजकारण चांगलच तापलं आहे. त्यात आता राणा विरुद्ध थेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंत्र्यांना आव्हान देणं नवनीत राणांना पडणार महागात, पुन्हा जावं लागणार तुरुंगात?
रणरणत्या उन्हात आदित्य ठाकरेंनी गावकऱ्यांसोबत खालीबसून केली चर्चा; म्हणाले, एकत्र काम करुया
याला म्हणतात खरी मदर इंडिया! लहान वयात झाली विधवा, शेती करून ४ मुलांना बनवले अधिकारी
‘वसंत तु मिसळ महोत्सव घे, मी येतो’; नाराजीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा वसंत मोरेंना सल्ला

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now