औरंगाबादच्या सिल्लोड- सायगाव मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत झालं. शिंदे गटात सामील असणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांच्या या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे हजारो कार्यकर्त्यांनी मोठे स्वागत केले. ते पाहता मुख्यमंत्री सुद्धा भारावून गेले. (Abdul Sattar said that even if the sign of a dog is given, I will be elected)
मतदारसंघातील सर्व जाती- धर्मांच्या लोकांचा मोठा पाठिंबा सत्तारांना असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांना यावेळी पटला असल्याचे दिसून आले. त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला.
आमदार अब्दुल सत्तार यांना आपल्या विजयाची खात्री किती आहे? याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मला एकदा सत्तार म्हणाले, कुत्रा हे चिन्ह जरी दिले तरी मी निवडून येईल. कारण कुत्रा हा प्राणी त्याच्या इमानदारीसाठी ओळखला जातो. माझ्या मतदारसंघातील लोकांनी गेली २५ वर्ष मला निवडून देत, माझ्या प्रामाणिक कामाची दखल घेतली आहे.’
आमदार अब्दुल सत्तार सिल्लोड मतदार संघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. सत्तारांचे सोशल इंजीनियरिंग चांगले आहे. ते भाषणाच्या शेवट अदाब, राम राम, जय भीम, जय महाराष्ट्र, अशा शब्दांनी करतात. महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री पद माविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे होते.
अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळाच्या यादीतून पत्ता कट झाल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. त्यासाठी त्यांनी थेट दिल्ली गाठली. ठाकरे सरकारच्या काळात मंत्रिपद उपभोगलेल्या अब्दुल सत्तार यांना शिंदे सरकारमध्ये तशी संधी मिळणार नाही, असे बोलले जात होते.
परंतु मुख्यमंत्री सिल्लोड मतदारसंघात हजारो कार्यकर्त्यांची गर्दी, अब्दुल सत्तारांना असलेला जनाधार पाहून भारावून गेले. एवढ्या मोठ्या शक्तीप्रदर्शनाचं मनावर ओझ घेऊन जणू काही एकनाथ शिंदे परतले असावेत. आता अब्दुल सत्तार यांच्या वाट्याला या सगळ्या गोष्टींमुळे मंत्रिपद येते की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.
महत्वाच्या बातम्या-
स्मृती इराणीच्या मुलीला मिळाली क्लीनचीट; ‘त्या’ रेस्तराँच्या प्रकरणात हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
शिवसेना काहीच दिवसांत संपून जाईल; जे.पी. नड्डांच्या या वक्तव्यावर ठाकरे संतापले; म्हणाले दुसऱ्यांना संपवण्याच्या नादात…
मला संजय राऊतांचा अभिमान, त्यांचा मरण आलं तरी शरण जाणार नाही हा बाणा मला आवडतो – उद्धव ठाकरे