Share

Ashok Chavhan : अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार; शिंदे सरकारमधील बड्या मंत्र्याने सांगीतली आतली बात

Ashok Chavhan

Ashok Chavhan : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस हे नवे सरकार स्थापन झाले. यातच खरी शिवसेना कोणाची हा वादही सुप्रीम कोर्टात सुरु आहे.

दरम्यान, अजूनही शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांमध्ये सतत आमदारांची इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरूच आहे. यात आता भाजपाचाही समावेश झाला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे गटाच्या बड्या नेत्याने हा खुलासा केला आहे. शिंदे गटाचे नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, या सर्व अफवा आहेत, असा खुलासा अशोक चव्हाणांनी केला होता. मात्र, आता पुन्हा त्यांच्या भाजपमधील प्रवेशाबद्दलच्या चर्चा रंगल्या आहेत.

आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबदल एक मोठे विधान आहे. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची कुजबुज सुरु आहे. तसेच चव्हाण यांचे समर्थक असलेल्या आमदारानेच आपल्याला ही माहिती दिली असल्याचे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेबद्दल प्रश्न विचारला. यावर अब्दुल सत्तार म्हणाले की, अशोक चव्हाण यांचे समर्थक असलेले आमदार राजूरकर यांना मी याबाबत विचारले होते. तेव्हा राजूरकर यांनीच अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची कुजबुज सुरु असल्याचे मला सांगितले, असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या
Ashok Chavan : त्या दिवशी दांडी मारल्यामुळे अशोक चव्हाणांना शिंदे सरकारकडून मिळालं रिटर्न गिफ्ट; चर्चेला उधाण
कॉंग्रेसला भलं मोठं भगदाड! अशोक चव्हाणांसह विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार?, कॉंग्रेसच्या गोटात खळबळ
अशोक चव्हाणांसह विश्वजीत कदमही भाजपच्या वाटेवर? स्वत: स्पष्टीकरण देतं केला मोठा खुलासा
अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश झाला निश्चीत? राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now