शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सध्या सर्व आमदार आसामच्या गुवाहटीमध्ये आहेत. (abdul sattar on cm uddhav thackeray)
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे आपण हे बंड करत असल्याचे अनेक आमदारांनी म्हटले आहे. आता शिंदे गटात सामील होणारे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.
अब्दुल सत्तार यांनी मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आमची भिकाऱ्यासारखी परिस्थिती झाली होती, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. अब्दुल सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे. पण आम्हाला कधीही वेळ मिळाला नाही. कधी बोलण्याची संधी मिळाली नाही. आमच्या कोणत्याही कामाची चर्चा होत नाही. प्रत्येकवेळी आम्हाला भिकाऱ्यासारखी भीक मागावी लागायची, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
तसेच अब्दुल सत्तारांना हिंदुत्व कळते का? असे म्हणणाऱ्या संजय राऊतांनाही यावेळी सत्तारांनी उत्तर दिले आहे. मी हिंदुत्ववादी पक्षातून निवडून आलो आहे. भगवा झेंडा आहे. तुम्ही असे अनैसर्गिक राजकारण केले आहे, जे जनतेला कधीही मान्य नव्हते, असेही अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात दोन गट पडले आहे. एक गट एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारा आहे, तर दुसरा गट हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारा आहे. यावेळी दोन्ही गटांकडून आपल्या नेत्यांचे शक्तीप्रदर्शन केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
..अन्यथा झेंडे काढून दांडे हातात घेऊ, क्रांती मोर्चाचा तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा
बंडखोरांना राजभवनात आणायला भाजपने आखला ‘हा’ प्लॅन; राज्यातील बड्या नेत्याचा खुलासा
‘उद्धवसाहेब..! तुम्ही मला तोतरा म्हणा, टमरेल म्हणा किंवा भ**, पण हिशोब तर द्यावा लागेल’