Share

‘बंडखोरीचे किती पैसे घेतले’ म्हणताच अब्दूल सत्तार भडकले, तरूणाला केली शिवीगाळ

एकनाथ शिंदे यांच्यासह काही शिवसेना आमदारांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा देखील समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांची एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बंडखोरी करण्यासाठी किती पैसे घेतले असे विचारणाऱ्या तरुणाला सत्तार यांनी फोनवरून थेट शिवीगाळ केला. याचीच ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये अब्दुल सत्तार यांना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचे फारीस कादरी असं नाव आहे. ऑडिओ क्लिप ऐकली तर त्यात, फारीस कादरी याने अब्दुल सत्तार यांना आधी कसे आहात असं विचारले. त्यानंतर सध्या कुठे आहात असा प्रश्न केला आहे.

अब्दुल सत्तार यांनी उत्तर देत म्हंटले, सध्या गोव्यात आहे. त्यावर या तरुणाने त्यांना चांगली पार्टी सुरू आहे वाटते गोव्यात असा खोचक टोला लगावला, आणि भाजपकडून किती पैसे घेतले असा प्रश्न विचारला. फारीस कादरीच्या या प्रश्नावर अब्दुल सत्तार यांना प्रचंड संताप आला.

त्यांनी शिवीगाळ करत आपला संताप व्यक्त केला. फारीस कादरी आणि अब्दुल सत्तार यांच्यामधील या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. मात्र ही ऑडिओ क्लिप खरी आहे का याबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. आता अब्दुल सत्तार यांना या नव्या सरकारमध्ये कोणते खाते मिळणार याबाबत सत्तार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now