Share

पुण्यातून अपहरण झालेला डुग्गू अखेर १० दिवसांनी सापडला; ३०० पोलीस घेत होते शोध

अखेर आठ दिवसांनी पुण्यातल्या डॉ. सतीश चव्हाण यांचा चार वर्षांचा मुलगा स्वर्णव सापडला आहे. आठ दिवसांपूर्वी पुण्यातील स्वर्णव चव्हाण या चार वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांना या मुलाचा शोध घेण्यात यश आलं आहे.

११ जानेवारीला त्याचं बालेवाडीतून अपहरण झालं होतं. पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती. त्याच्या शोधावेळी अत्यंत गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास ३०० ते साडेतीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले

दरम्यान, त्याचं कोणी अपहरण केलं? का केलं? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुनावळ्यातील लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला अज्ञात व्यक्तीने सोडले आणि  त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. त्याच्या वडिलांचा नंबर होता.

तेथील सुरक्षा रक्षक दादाराव जाधव याने बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल करून मुलगा त्यांचा आहे का ही खात्री करून घेतली. त्यानंतर मुलाचे कुटुंबीय त्या ठिकाणी आले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. तत्काळ त्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड पोलीस दाखल झाले होते.

मंगळवारी (ता.11) सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास बाणेर येथील हाय स्ट्रीट रस्त्यावरील इंदू पार्क सोसायटीजवळील उद्यानाजवळून स्वर्णव ऊर्फ डुग्गु सतीश चव्हाण (वय 4 वर्षे ) यास एक मुलगा “डे केअर’ला सोडविण्यासाठी पायी घेऊन जात होता.

त्यावेळी आलेल्या एका व्यक्तीने मोठ्या मुलाच्या हाताला झटका देऊन स्वर्णवला गाडीवरुन उचलून नेत त्याचे अपहरण केले होते. हा प्रकार बालेवाडी पोलिस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर घडला. याप्रकरणी मुलाच्या आई-वडीलांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या
शेवटी ते आबांचच रक्त…! विरोधकांचा धुव्वा उडवल्यावर रोहीत पाटलांचे पवारांकडून तोंडभरून कौतूक
पाठीत खंजीर खूपसत ‘या’ पाच खेळाडूंनी मित्राच्या पत्नी आणि आईसोबत ठेवले होते संबंध
नारायण राणेंना शिवसेनेचा जोरदार धक्का! स्वत:च्या जिल्ह्यातील २ नगरपंचायती गमावल्या
पारनेरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची काटे की टक्कर; जयश्री औटींचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी

क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now