Share

मुकेश अंबानींनी खरेदी केली 13.14 कोटींची अल्ट्रा लक्झरी रोल्स रॉयस, वाचा ‘या’ एसयूव्हीमधील खास फिचर्स

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असलेले आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ‘मुकेश अंबानी‘ हे त्यांच्या लक्झरी कार कलेक्शनसाठी ओळखले जातात. यामध्ये त्यांनी आता अजून एका नवीन आलिशान कारचा समावेश केला आहे. ज्याची किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.(abani-buys-rs-13-14-croree-ultra-luxury-rolls-royce)

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकाने 13.14 कोटी रुपयांची अल्ट्रा-लक्झरी रोल्स रॉयस कलिनन एसयूव्ही(Ultra-luxury Rolls Royce Cullinan SUV) खरेदी केली आहे. ही हॅचबॅक कार आहे. आरटीओ अधिकार्‍यांच्या मते, ही देशातील आतापर्यंतची सर्वात महागडी कार खरेदी आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाडीची नोंदणी 31 जानेवारी रोजी साउथ मुंबईतील तारदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली होती. ही कार 2018 मध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि तेव्हा तिची किंमत ₹ 6.95 कोटी होती. पण कस्टमाइज्ड बदलांमुळे कारच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे ऑटो उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.

RTO अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीने 2.5 टन पेक्षा जास्त वजनाच्या आणि 564 bhp पॉवर निर्माण करणाऱ्या 12-सिलेंडर कारसाठी ‘टस्कन सन’ कलरचा पर्याय निवडला आहे. गाडीसाठी खास नंबर प्लेट तयार करण्यात आली आहे. अंबानींच्या या नवीन कारची नोंदणी 30 जानेवारी 2037 पर्यंत वैध आहे.

यासोबतच RIL ने एक वेळ कर म्हणून 20 लाख रुपये जमा केले आहेत. तसेच रस्ता सुरक्षेसाठी 40,000 रुपयांचे वेगळे पेमेंटही करण्यात आले आहे. आरटीओ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही भारतात खरेदी केलेली सर्वात महागडी कार देखील असू शकते.

RIL ने आपल्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरच्या नवीन कारला VIP नंबर मिळवण्यासाठी 12 लाख रुपये दिले आहेत. ज्याचा क्रमांक “0001” वर संपतो. साधारणपणे एका व्हीआयपी क्रमांकाची किंमत 4 लाख रुपये असते, परंतु सध्याच्या सिरीजमध्ये निवडलेला क्रमांक आधीच घेतला होता, त्यामुळे नवीन सिरीज सुरू करण्यात आली आहे.

Rolls Royce Cullinan भारतात 2018 मध्ये हॅचबॅक म्हणून लॉन्च करण्यात आली होती. अंबानींच्या गॅरेजमधील हे तिसरे कुलीनन मॉडेल असेल. इतर काही उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटी देखील हे मॉडेल वापरतात. ब्रिटीश निर्मात्याच्या वेबसाइटनुसार, Cullinan ही Rolls-Royce ची पहिली ऑल-टेरेन SUV आहे. RIL च्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या आलिशान गाड्या आहेत.

रोल्स रॉयस कलिनन हे नाव आतापर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या हिऱ्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे. आलिशान SUV मध्ये 6.75-लिटर ट्विन-टर्बो V12 रोल्स-रॉयस इंजिन आहे जे 563bhp आणि ऑल-व्हील ड्राइव्ह आणि ऑल-व्हील स्टीयर सिस्टमसह 850Nm टॉर्क जनरेट करते.

इतर

Join WhatsApp

Join Now